Post Office Saving Scheme sakal
अर्थविश्व

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवा फक्त 50 रुपये; मिळेल लाखोंचा फायदा

पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करणे म्हणजे शून्य जोखमीवर चांगले परतावा मिळणे.

सकाळ डिजिटल टीम

Post Office Investment Scheme: आजच्या युगात गुंतवणूक करणं गरजेचं बनलं आहे. तुम्ही आज केलेली गुंतवणूक तुम्हाला भविष्यात कधी मदत करेल, हे सांगता येत नाही. जेव्हा जेव्हा गुंतवणुकीचा विचार डोक्यात येतो तेव्हा अनेक पर्याय समोर उभे राहतात. काही गुंतवणुकीत जास्त जोखीम असते तर काही गुंतवणुकीत कमी जोखीम असते. परंतु पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करणे खूपच सुरक्षित मानले जाते. पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करणे म्हणजे शून्य जोखमीवर चांगले परतावा मिळणे.

पोस्ट ऑफिसच्या अशा अनेक लहान बचत योजना आहेत ज्यात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते. या योजनांमध्ये जोखीम नगण्य आहे आणि परतावाही जास्त आहे. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या अशाच एका योजनेबद्दल सांगणार आहोत. 'ग्राम सुरक्षा योजना' असे या योजनेचे नाव आहे.

35 लाखांचा होईल फायदा -

पोस्ट ऑफिसच्या 'ग्राम सुरक्षा योजने'मध्ये (Gram Suraksha Scheme) जोखीम खूपच कमी आहे आणि परतावाही चांगला आहे. या योजनेत तुम्हाला दरमहा १५०० रुपये जमा करावे लागतील. जर तुम्ही या योजनेत नियमितपणे पैसे जमा करत असाल तर तुम्हाला नंतर 31 ते 35 लाखांचा लाभ मिळेल.

हे आहेत गुंतवणुकीचे नियम:

कोणताही भारतीय नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतो.

गुंतवणुकीसाठी तुमचे वय 19 ते 55 वर्षांच्या दरम्यान असावे.

या योजनेत किमान विम्याची रक्कम 10,000 ते 10 लाख रुपये असू शकते.

या योजनेतील प्रीमियम मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक भरले जाऊ शकतात.

यामध्ये प्रीमियम भरण्यासाठी ३० दिवसांचा अतिरिक्त कालावधी दिला जातो.

या योजनेद्वारे तुम्ही कर्ज देखील घेऊ शकता.

तुम्ही ही योजना घेतल्यानंतर ३ वर्षांनी सरेंडरही करू शकता. परंतु असे केल्याने तुम्हाला फारसा फायदा होणार नाही.

तुम्हाला किती फायदा होईल?-

जर तुम्ही वयाच्या 19 व्या वर्षी या योजनेत गुंतवणूक केली आणि 10 लाख रुपयांची पॉलिसी घेतली, तर त्याचा 55 वर्षांसाठी मासिक प्रीमियम रु. 1515, 58 वर्षांसाठी रु. 1463 आणि 60 वर्षांसाठी रु. 1411 होईल. आता मॅच्युरिटीच्या वेळी तुम्हाला 55 वर्षांसाठी 31.60 लाख रुपये, 58 वर्षांसाठी 33.40 लाख रुपये आणि 60 वर्षांसाठी 34.60 लाख रुपयांचा लाभ मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AC कोचच्या बाथरुममध्ये आढळला पाच वर्षांच्या मुलीचा मृतदेह....मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमध्ये खळबळ

Success story: गुन्हेगारीमुळे बदनाम होतं गाव! आता प्रत्येक घरामध्ये आहेत अधिकारी; नेमका बदल कसा झाला?

Latest Marathi News Updates : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्वच्छ सन्मान सोहळ्याला, उप मुख्यमंत्री अजित पवार उपस्थित

Crime News : जुने नाशिक मधील मसाज पार्लरवर पोलिसांचा छापा; देहविक्री व्यवसाय उघड, ५ महिलांची सुटका

Asia Cup 2025: भारताच्या ७ खेळाडूंचे आशिया चषक संघात पदार्पण; त्यापैकी पाच प्लेइंग इलेव्हनमध्ये नक्की दिसणार

SCROLL FOR NEXT