post office esakal
अर्थविश्व

Post Office : 10 वर्षात 24 लाख! महिन्याला किती गुंतवणूक करायची?

नियमित बचत आणि गुंतवणुकीची सवय तुम्हाला तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यात मदत करते.

शिल्पा गुजर

नियमित बचत आणि गुंतवणुकीची सवय तुम्हाला तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यात मदत करते.

Post office RD: नियमित बचत आणि गुंतवणुकीची सवय तुम्हाला तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यात मदत करते. तुम्हाला मार्केटमध्ये कोणतीही जोखीम न घेता 5 किंवा 10 वर्षात मोठा निधी तयार करायचा असेल, तर पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट खाते (Post Office Recurring Deposit) हा सर्वोत्तम पर्याय आहे. या योजनेची मॅच्युरिटी (Maturity) 5 वर्षे आहे आणि ती आणखी 5 वर्षांसाठी वाढवता येऊ शकते. पोस्ट ऑफिसमध्ये (Post office) ठेवीवर कोणताही धोका नाही, यामध्ये पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत.

10 वर्षात 24 लाखांचा निधी ?

पोस्ट ऑफिस स्मॉल सेव्हिंग स्कीम (Small savings scheme) आरडीमध्ये दर महिन्याला नियमित ठेव हा हळूहळू एक मोठा फंड होईल. पोस्ट ऑफिसच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, आता तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये रिकरिंग डिपॉझिट (RD) मध्ये फक्त 100 रुपयांमध्ये गुंतवणूक सुरू करू शकता. यामध्ये ही सुविधा आहे की एकदा 100 रुपयांनी खाते उघडल्यानंतर तुम्ही 10-10 रुपयांच्या पटीत आणखी ठेवी करू शकता. यामध्ये गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही.

पोस्ट ऑफिसच्या आरडीमध्ये सध्या 5.8 टक्के वार्षिक व्याज मिळत आहे. यामध्ये, व्याजाची चक्रवाढ तिमाही आधारावर केली जाते. यामध्ये, जर तुम्ही 5 वर्षांसाठी दरमहा 15,000 रुपये जमा केले आणि ते आणखी 5 वर्षांसाठी वाढवले, तर तुम्हाला 120 महिन्यांत म्हणजेच 10 वर्षांच्या मॅच्युरिटीवर 24 लाख रुपये (24,39,714) मिळतील. यामध्ये, तुमचे 18 लाख रुपये जमा असतील आणि त्यावर 6,39,714 रुपये व्याज मिळेल.

फक्त 100 रुपयांत खाते सुरू करा

पोस्ट ऑफिसच्या कोणत्याही शाखेत फक्त 100 रुपयांमध्ये आरडी खाते उघडता येते. यामध्ये एखादी व्यक्ती कितीही खाती उघडू शकते. यामध्ये जास्तीत जास्त 3 जणांचे जॉइंट अकाऊंट सुद्धा उघडता येते. अल्पवयीन मुलांसाठी पालक खाते उघडले जाऊ शकते. पोस्ट ऑफिस आरडी खात्याची परिपक्वता 5 वर्षे आहे. पण, प्री-मॅच्युअर क्लोजर 3 वर्षांनी करता येते.

पोस्ट ऑफिसमधील आरडी खात्यावर कर्ज सुद्धा घेता येते. 12 हप्ते जमा केल्यानंतर तुमच्या अकाऊंटमध्ये जमा रकमेच्या 50 टक्क्यांपर्यंत कर्ज घेता येते. कर्जाची परतफेड एकरकमी किंवा हप्त्यांमध्ये करू शकता. कर्जाचा व्याजदर आरडीवरील व्याजापेक्षा २ टक्के जास्त असेल. त्यात नॉमिनेशनचीही सोय आहे.

नोंद - अधिक माहितीसाठी जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट द्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: श्रेयस अय्यरला डावलून शुभमन गिलला संधी; मांजरेकर बसरले, 'हा अन्याय आहे...'

Viral: पतीने गर्भनिरोधक गोळी खरेदी केली, ऑनलाइन पैसे दिले, पण एक छोटी चूक अन् पत्नीसमोर अनैतिक संबंधाचे बिंग फुटले!

Latest Marathi News Updates : ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर

BCCI चा मोठा निर्णय! एकदिवसीय क्रिकेटला नवा आकार; प्लेट ग्रुप सिस्टीम लागू, नेमका बदल काय होणार?

Shirur Crime : मेडिकल चालकाची डॉक्टरला शिवीगाळ करीत पट्ट्याने मारहाण; डॉक्टर जखमी

SCROLL FOR NEXT