Post Office Scheme sakal
अर्थविश्व

Post Office Scheme : 1 लाखाचे होतील 2 लाख; 'या' सरकारी स्‍कीममध्ये मिळणार डबल रिटर्न

तुम्ही सरकारच्या या योजनेत गुंतवणूक केल्यास 123 महिन्यांत तुमचे पैसे दुप्पट होतील.

सकाळ डिजिटल टीम

प्रत्येकाला अशा ठिकाणी गुंतवणूक करायची असते जिथे त्यांचे पैसे दुप्पट होतात. हे शक्य आहे आणि यासाठी बरेच पर्यायही आहेत, शिवाय जोखीमही आहे. पण तुम्हाला कोणताही प्रकारचा धोका नको असेल तर पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्रमध्ये (KVP) गुंतवणूक करु शकता. सरकारने 1 ऑक्टोबर 2022 पासून या योजनेवरील व्याजातही वाढ केली आहे.

किसान विकास पत्रावर (KVP) सरकार 1 ऑक्टोबर 2022 पासून वार्षिक 7 टक्के दराने व्याज देत आहे. यामध्ये व्याजाची चक्रवाढ वार्षिक आधारावर केली जाते. तुम्ही सरकारच्या या योजनेत गुंतवणूक केल्यास 123 महिन्यांत तुमचे पैसे दुप्पट होतील. समजा, तुम्ही या योजनेत 1 लाख रुपये गुंतवले, तर 123 महिन्यांनंतर (10 वर्ष 3 महिने) तुम्हाला 2 लाख रुपये मिळतील.

तुम्ही किसान विकास पत्रामध्ये किमान 1,000 रुपयांची गुंतवणूक करू शकता, त्यानंतर 100 रुपयांच्या पटीत गुंतवणूक केली जाऊ शकते. या योजनेत जास्तीत जास्त गुंतवणुकीवर मर्यादा नाही. सरकार किसान विकास पत्र प्रमाणपत्रे 1000 रुपये, 5,000 रुपये, 10,000 रुपये, 50,000 रुपये मूल्यांमध्ये विकते. या योजनेअंतर्गत तुम्ही कितीही खाती उघडू शकता.

किसान विकास पत्रातील गुंतवणुकीवर कर सवलतीचाही फायदा आहे. यामध्ये कलम 80C अंतर्गत, तुम्ही 1.50 लाख रुपयांपर्यंत कर सवलत मिळवू शकता. यामध्ये काही अटींसह मुदतपूर्व बंद (Premature Closing) करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. खातेदार त्यांचे पैसे 2 वर्ष आणि 6 महिन्यांच्या आत काढू शकतात.

कोणतीही व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकते. जॉईंट अकाउंटही उघडता येते, पण एका खात्यात तीनपेक्षा जास्त लोक असू शकत नाहीत. 10 वर्षांवरील अल्पवयीन व्यक्ती त्याच्या नावाने ते उघडू शकतो.

यासाठी, तुम्ही आधी केव्हीपी (KVP) फॉर्म भरला पाहिजे. हा फॉर्म पोस्ट ऑफिसच्या शाखेत किंवा ऑनलाइनही उपलब्ध आहे. हा फॉर्म भरल्यानंतर ब्रांचमध्ये जमा करावा लागेल. केवायसीसाठी, तुम्हाला आधार कार्ड, निवासी प्रमाणपत्र, वय प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि मोबाइल नंबर लागेल. केव्हीपी तुम्ही कधीही कॅश, चेक, पे ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्टद्वारे खरेदी केले जाऊ शकते.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

SCROLL FOR NEXT