मंगळवारी सेन्सेक्स, निफ्टी जवळपास 1 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. सेन्सेक्स 563 अंकांनी वाढून 60656 वर बंद झाला आणि निफ्टी 158 अंकांनी वाढून 18053 वर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये फ्लॅट क्लोजझिंग दिसले, तरी सर्वाधिक खरेदी एनर्जी, एफएमसीजी आणि रियल्टी शेअर्समध्ये झाली.
इन्फ्रा आणि आयटी संबंधित शेअर्समध्येही तेजी दिसून आली. दुसरीकडे, 2 दिवसांच्या वाढीनंतर, पीएसयू बँक इंडेक्समध्ये विक्री झाली. मात्र, खासगी बँकांमधील खरेदीमुळे निफ्टी 16 अंकांनी वाढून 42235 वर बंद झाला. तर मिडकॅप 35 अंकांनी घसरून 31218 वर बंद झाला.
आज कशी असेल बाजाराची स्थिती ?
गेल्या काही ट्रेडिंग सत्रांपासून बाजार नकारात्मक ट्रेंडसह सुस्ती दाखवत असल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान यांचे म्हणणे आहे. अमेरिकेतील महागाई कमी होण्याच्या आशेने आणि चीन पुन्हा उघडल्यापासून मागणी वाढल्याने जागतिक बाजारपेठांमध्ये तेजी दिसत आहे.
अशात भारतीय बाजारातही तेजी दिसून आली आहे. पण बाजाराचा अंडरटोन नकारात्मक ट्रेंडसह सावध राहण्याचा आहे.
तांत्रिकदृष्ट्या, बाजाराने डेली चार्टवर बुलिश कँडल तयार केली आहे. त्याने इंट्राडे चार्टवर हायर बॉटम फॉर्मेशन तयार केले आहे जे सध्याच्या पातळीपासून बाजारात आणखी चढ-उतार दाखवत आहे. 17950 ची लेव्हल हा एक मजबूत सपोर्ट आहे.
निफ्टीने याच्या वर टिकून राहिल्यास ही तेजी 18100-18200 पर्यंत जाऊ शकते. दुसरीकडे, जर निफ्टी 17950 च्या खाली घसरला तर ही घसरण 17900-17850 पर्यंत जाऊ शकते.
आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?
एल अँड टी (LT)
हिंदुस्थान युनिलिव्हर (HINDUNILVR)
एचडीएफसी (HDFC)
एचसीएल टेक (HCLTECH)
टीसीएस (TCS)
इंडियन हॉटेल (INDHOTEL)
ऍस्ट्रल (ASTRAL)
पेज इंडिया (PAGEIND)
ए यू बँक (AUBANK)
व्होल्टास (VOLTAS)
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.