Share Market pre analysis esakal
अर्थविश्व

बाजार सुरू होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

निफ्टीच्या सावध ट्रेंडमध्ये बाजारात चांगली रिकव्हरी झाल्याचे मेहता इक्विटीज प्रशांत तापसे म्हणाले.

सकाळ डिजिटल टीम

Share Market: सोमवारी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात चांगली झाली. 21 सप्टेंबर रोजी होणार्‍या फेडरल ओपन मार्केट कमिटीच्या (FOMC) बैठकीपूर्वी आणि इतर आशियाई आणि युरोपीय बाजारांची कमकुवत कामगिरी असूनही, भारतीय बाजार सकारात्मक दिसून आला. सोमवारच्या चांगल्या क्लोझिंगमुळे भारतीय शेअर बाजारातील तीन दिवसांच्या घसरणीला ब्रेक लागला. 30 शेअर्सचा BSE सेन्सेक्स 300 अंकांनी अर्थात 0.51 टक्क्यांनी वाढून 59,141 वर पोहोचला. तर निफ्टी 91 अंकांनी अर्थात 0.52 टक्क्यांनी वाढून 17,622 वर बंद झाला.

भारत TINA चा (there is no alternative - कोणताही पर्याय नाही) आनंद घेत आहे. यामुळे परदेशी गुंतवणूकदारांनी सोमवारी खरेदीमध्ये काही रस दाखवला. शुक्रवारी FII ने भारतीय शेअर्समधून 1,200 कोटी रुपये काढल्यानंतर बाजार सुमारे 2 टक्क्यांनी घसरला होता.

मेटल आणि रियल्टी वगळता निफ्टीच्या सर्व सेक्टरल इंडेक्सने कमबॅक केले. या दोन्ही इंडेक्समध्ये विक्रीचा दबाव कायम राहिला. ते अनुक्रमे 0.95 आणि 0.45 टक्क्यांनी घसरले. पीएसयू बँक इंडेक्स सर्वात मोठ्या वाढीसह दोन टक्क्यांहून अधिक वाढला. एफएमसीजी आणि ऑटो इंडेक्स प्रत्येकी एक टक्का वाढले.

एम अँड एम, बजाज फायनान्स, एसबीआय लाइफ इन्शुरन्स, अदानी पोर्ट्स आणि एचयूएल हे निफ्टीमध्ये 2-3 टक्क्यांच्या दरम्यान वाढले. टाटा स्टील, टाटा मोटर्स, ब्रिटानिया, आयसीआयसीआय बँक आणि पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. त्यात प्रत्येकी 2 ते 2.5 टक्क्यांची घसरण दिसून आली.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

तांत्रिकदृष्ट्या घसरणीनंतर निफ्टीला 17450 जवळ सपोर्ट मिळाला. यानंतर निफ्टी 17580-17665 च्या दरम्यान व्यवहार करताना दिसल्याचे कोटक सिक्युरीटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. जर निफ्टी 17550 च्या वर ट्रेड करत असेल तर पुल-बॅक फॉर्मेशन चालू राहण्याची शक्यता आहे. यावर निर्देशांक 17675 च्या 20 दिवसांच्या SMA पातळीला स्पर्श करू शकतो. निफ्टी वर गेल्यास 17800 पर्यंत जाऊ शकतो. दुसरीकडे, निफ्टी 17550 च्या खाली गेल्यास, निफ्टी पुन्हा 17450- 17400 च्या पातळीवर सरकू शकतो.

निफ्टीच्या सावध ट्रेंडमध्ये बाजारात चांगली रिकव्हरी झाल्याचे मेहता इक्विटीज प्रशांत तापसे म्हणाले.  तांत्रिकदृष्ट्या, निफ्टीला सर्वात मोठा सपोर्ट  17429 वर असेल. याच्या खाली निफ्टी 17161 च्या खालच्या पातळीवर जाऊ शकतो. वरच्या बाजूने, निफ्टीला 17867 वर रझिस्टंस आहे. जर ही पातळी ओलांडली तर त्याला 18115 स्तरावर रझिस्टंस आहे.

  • आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

    महिन्द्रा अँड महिन्द्रा (M&M)
    बजाज फायनान्स (BAJAJFIN)
    अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)
    एसबीआय लाईफ (SBILIFE)
    हिंदुस्थान युनिलिव्हर (HINDUNILVR)
    झी एन्टरटेन्मेंट लिमिटेड (ZEEL)
    हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDUPETRO)
    ऍस्ट्रल (ASTRAL)
    भारतीय कंटेनर निगम (CONCOR)
    अशोक लेलँड (ASHOKLEY)

    नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithvi Shaw: ठरलं! मुंबई सोडलेल्या पृथ्वी शॉला मिळाला नवा संघ, आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

Latest Maharashtra News Updates : एरंडोल तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी समाधानकारक पाऊस

Video: धक्कादायक! रिलसाठी अल्पवयीन मुलाने ट्रेन ट्रॅकवर जीव धोक्यात टाकला, व्हायरल व्हिडिओ

सुलतानला नऊ वर्षं पूर्ण ! सलमानने सिनेमासाठी स्वतःमध्ये घडवलेले हे पाच बदल

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

SCROLL FOR NEXT