Pre Analysis Of Share Market Update
Pre Analysis Of Share Market Update esakal
अर्थविश्व

बाजार सुरू होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

सकाळ डिजिटल टीम

बुधवारी बाजार काहीशा वाढीसह सपाट बंद झाला. कमकुवत जागतिक संकेतांमुळे गुंतवणूकदार सावध दिसले. यूएस फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्या जॅक्सन होलच्या भाषणाकडे आता बाजाराची नजर आहे.

या भाषणातून यूएस फेडच्या व्याजदरांबाबत कल्पना येईल. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 54.13 अंकांच्या म्हणजेच 0.09 टक्क्यांच्या वाढीसह 59,085.43 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 24.50 अंकांच्या म्हणजेच 0.14 टक्क्यांच्या वाढीसह 17,602.00 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

निफ्टी 23 ऑगस्ट रोजी 18000 स्तरावरून घसरणीच्या पहिल्या टप्प्यात त्याच्या 20-DMA जवळ सपोर्ट घेताना दिसल्याचे शेअरखानचे गौरव रत्नपारखी म्हणाले. तेव्हापासून निफ्टी हलकी उसळी घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. गेल्या काही ट्रेडिंग सत्रांमध्ये निफ्टी वर आणि खाली ट्रेंड करत आहे आणि आता तो त्याच्या 40-hour EMA आणि अवरली अप्पर बोलिंजर बँडच्या बैठक बिंदूवर पोहोचला आहे.

खाली निफ्टीला 17350-17300 वर पहिला सपोर्ट दिसतो. हा सपोर्ट तुटला तर निफ्टी अल्पावधीत 17000 पर्यंत घसरताना दिसू शकतो. दुसरीकडे, निफ्टीने वरच्या बाजूने 17650-17700 ची पातळी ओलांडली, तर तेजी दिसू शकते.

25 ऑगस्टची मंथली एक्सपायरी संपण्यापूर्वी बाजार सावध दिसत होता असे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. यूएस फेड अध्यक्षांच्या भाषणापूर्वी बाजार साइडलाइन झाला. तांत्रिक दृष्टीकोनातून, निफ्टी शॉर्प रिव्हर्सल फॉर्मेशन नंतर रेंजमध्ये फिरत असल्याचे दिसते. याने इंट्राडे चार्टवर हायर बॉटम फॉर्मेशन केले आहे जे येत्या काळात पुलबॅक रॅली चालू ठेवण्याचे संकेत देते.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

  • अपोलो हॉस्पिटल (APOLLOHOSP)

  • इंडसइंड बँक (INDUSINDBK)

  • ओएनजीसी (ONGC)

  • आयसीआयसीआय बँक (ICICIBANK)

  • एनटीपीसी (NTPC)

  • आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)

  • झी एन्टरटेन्मेंट लिमिटेड (ZEEL)

  • ऍस्ट्रल (ASTRAL)

  • भारतीय कंटेनर निगम (CONCOR)

  • अशोक लेलँड (ASHOKLEY)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT