share market esakal
अर्थविश्व

Share Market : आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म ?

पॉवर आणि बँकिंगमध्ये सगळ्यात जास्त तेजी दिसून आली तर रिअल्टी आणि मेटल शेअर्समध्ये हलकी विक्री दिसली.

सकाळ डिजिटल टीम

शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजार किंचित वाढीसह बंद झाला. सेन्सेक्स 21 अंकांनी वाढून 62294 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी वरच्या पातळीपासून 350 हून अधिक अंकांनी घसरला.

व्यवहाराच्या शेवटी, निफ्टी 29 अंकांनी वाढून 18513 वर बंद झाला. त्याचवेळी निफ्टी बँक 91 अंकांनी घसरून 42984 वर बंद झाला. तर मिडकॅप 298 अंकांनी वाढून 31588 वर बंद झाला. स्मॉलकॅप आणि मिडकॅप शेअर्समध्ये खरेदी झाली. तर पॉवर आणि बँकिंगमध्ये सगळ्यात जास्त तेजी दिसून आली तर रिअल्टी आणि मेटल शेअर्समध्ये हलकी विक्री दिसली.

सेन्सेक्समधील 30 पैकी 16 शेअर्स घसरले. त्याचवेळी निफ्टीच्या 50 पैकी 29 शेअर्समध्ये तेजी दिसली. निफ्टी बँकेचे 12 पैकी सहा शेअर्स वाढले. (pre analysis of share market update 28 November 2022)

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

डेली चार्टवर निफ्टी हायर हाय हायर बॉटम फॉर्मेशनमध्ये ट्रेड करत असल्याचे सॅमको सिक्युरिटीजचे अपूर्व सेठ म्हणाले. यातील तेजी बुलिश ट्रेंड कायम राहण्याचे लक्षण आहे. आता निफ्टीमध्ये रूल ऑफ पोलॅरिटीचा नियम लागू होताना दिसेल, म्हणजे जिथे आधीचा रझिस्टंस आता बाजाराचा सपोर्ट बनेल.

डेली चार्टवर, मोमेंटम ऑसिलेटर आरएसआयने (14)  55-60 स्तरांभोवती एक बुलिश हिडन डाइवर्जंस तयार केला, त्यानंतर त्यात आणखी तेजी दिसली. तांत्रिक दृष्टिकोनातून, निफ्टीला 18250 च्या आसपास सपोर्ट दिसतो. जर हा सपोर्ट डाउनसाइडवर तुटला तर ही घट 18100 च्या पातळीपर्यंत जाऊ शकते. तर वरच्या बाजूस, निफ्टीचा पहिला रझिस्टन्स 18650 वर आहे आणि दुसरा मोठा रेझिस्टन्स 18800 वर आहे.

गुरुवारच्या दमदार तेजीनंतर शुक्रवारी शेअर बाजार मंदावल्याचे दिसल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा यांनी सांगितले. व्यापाराच्या शेवटी तो जवळजवळ सपाट बंद झाला. निफ्टीची सुरुवात थोड्या घसरणीसह झाली. बेंचमार्क निर्देशांकांनी विक्रमी उच्चांक गाठल्याने, ब्रॉडर मार्केटमध्ये नवीन तेजीचा कल दिसू शकतो. याशिवाय जागतिक बाजाराची स्थिती आणि दिशा याचा भारतीय बाजारावरही परिणाम दिसून येईल असेही ते म्हणाले.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

एचडीएफसी लाईफ (HDFCLIFE)
टाटा मोटर्स (TATAMOTORS)
हिरो मोटो कॉर्प (HEROMOTOCO)
कोल इंडिया (COALINDIA)
रिलायन्स (RELIANCE)
झी एन्टरटेन्मेंट लिमिटेड (ZEEL)
बालक्रिष्ण इंडस्ट्रीज (BALKRISIND)
आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)
पर्सिस्टंट (PERSISTENT)
अशोक लेलँड (ASHOKLEY)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पोलिसात न्या, तिथं बघतोच तुम्हाला, माझा बाप...' मनसे नेत्याच्या लेकाची इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ, अर्धनग्नावस्थेतला VIDEO VIRAL

Pune News: शिक्षकांचे आंदोलन सुरू, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,शाळा ८, ९ जुलैला बंद राहणार नाहीत, शिक्षण विभाग

Sangli Muharram: 'हिंदू-मुस्लिम ऐक्याची दीडशे वर्षांची परंपरा'; गगनचुंबी ताबुतांच्या कडेगावात गळाभेटी

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT