Share Market Sakal
अर्थविश्व

काल शेअर बाजारात प्रॉफिट बुकिंगचे वर्चस्व, आज कोणते 10 शेअर्स करतील मालामाल?

काल मेटल, पॉवर, फार्मा आणि ऑइल-गॅस शेअर्मध्ये सर्वाधिक खरेदी झाली.

शिल्पा गुजर

विकली एक्सपायरीच्या एक दिवस आधी अर्थात बुधवारी सेन्सेक्स 304 अंकांनी घसरून 57,685 वर बंद झाला, तर निफ्टी 70 अंकांनी घसरून 17,246 वर बंद झाला. निफ्टी बँक 201 अंकांनी घसरून 36,147 वर बंद झाला. त्याच वेळी, मिडकॅप 160 अंकांनी वाढून 29,137 वर बंद झाला. मेटल, पॉवर, फार्मा आणि ऑइल-गॅस शेअर्मध्ये सर्वाधिक खरेदी झाली.

सेन्सेक्सचे (Sensex) 30 पैकी 18 शेअर्स घसरले. निफ्टीच्या (Nifty) 50 पैकी 28 शेअर्सची तर निफ्टी बँकेच्या 12 पैकी 7 शेअर्सची विक्री दिसून आली. डॉलरच्या तुलनेत रुपयातही कमजोरी होती. रुपाया 18 पैशांनी कमजोर होऊन 76.31 वर बंद झाला. हेल्थकेअर, मेटल, ऑईल अँड गॅस, पॉवर इंडेक्स हिरव्या रंगात बंद झाले. त्याच वेळी, ऑटो, बँक, कॅपिटल गुड्स आणि एफएमसीजीमध्ये विक्री दिसून आली.

नुकत्याच झालेल्या तेजीनंतर बाजारात सावधगिरी बाळगली जात असल्याचे जिओजित फायनान्शिअलचे विनोद नायर म्हणाले. सप्लायमध्ये येत असलेल्या अडचणींमुळे महागाईचा ताण पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. इनपुट कॉस्टमध्ये सतत होणारी वाढ, जगाच्या अनेक भागांमध्ये कोविड प्रकरणांमध्ये वाढ झाल्यामुळे मागणीत घट, रशिया-युक्रेन युद्ध, वस्तूंच्या वाढत्या किमती यामुळे कमाईच्या वाढीवर दबाव येत आहे. त्यामुळे पुढे जाऊन आउटलुकमध्ये डाउन-ग्रेडिंग होण्याची शक्यता असल्याचेही नायर म्हणाले.

आज बाजाराची वाटचाल कशी राहील?

वाढत्या अस्थिरतेमुळे देशांतर्गत बाजार गेल्या काही दिवसांपासून एका पट्टीत अडकल्याचे मोतीलाल ओसवालचे सिद्धार्थ खेमका म्हणाले. बाजाराचा एकूण कल सकारात्मक राहिल्याचेही ते म्हणाले. बाजारात रशिया-युक्रेन युद्ध, कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ, यूएस फेडची आक्रमक वृत्ती यामुळे अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे बाजारात सावध वातावरण आहे.

आज कोणत्या 10 शेअर्सवर कराल फोकस?

डिवीज लॅबोरेटॉरी (DIVISLAB)

हिन्दाल्को (HINDALCO )

टाटा स्टील (TATASTEEL)

डॉ. रेड्डी (DRREDDY)

युनायटेड फॉस्फोरस लिमिटेड (UPL)

एयू बँक (AUBANK)

झी एन्टरटेन्मेंट लिमिटेड (ZEEL)

गुजरात गॅस लिमिटेड (GUJGASLTD)

व्होल्टास (VOLTAS)

ट्रेंट (TRENT)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Involvement in Red Fort Blast : अखेर पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा फाटलाच! दिल्ली स्फोटातील सहभागाची नेत्यानेच दिली कबूली

Petrol Pump : पेट्रोल पंप संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय मागे; पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय

Mundhwa Land Case : मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानींचा जबाब नोंदविला

Pravin Darekar : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला गती; सहकाराला आधुनिकतेची जोड द्यावी

Property Tax : समाविष्ट गावाच्या मिळकतकराचा प्रश्‍न जैसे थे; पूर्वीच्याच आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT