Stocks to Buy
Stocks to Buy Sakal
अर्थविश्व

दोन रुपयांच्या मल्टीबॅगर स्टॉकने 19 वर्षांत केली एवढी वाढ

शिल्पा गुजर

लाँग टर्मसाठी घेतलेले शेअर्स तुम्हाला खूप फायदा करुन देतात.

Multibagger stock : शेअर बाजारात गुंतवणूक करणे हे म्हणजे व्यवसायात गुंतवणूक (Invesment) करण्यासारखेच आहे. दिग्गज गुंतवणूकदार चार्ली मुंगेर यांच्या मते, एखादा चांगला स्टॉक विकत घेऊन, शक्य तितक्या काळ त्यात राहावे. लाँग टर्मसाठी घेतलेले शेअर्स तुम्हाला खूप फायदा करुन देतात. चार्ली मुंगेर हे वॉरन बफेचे व्यावसायिक भागीदार आहेत. आता उदाहारण घेऊयात, रामा फॉस्फेट्सचा (Rama Phosphates) हा स्टॉक 2021 च्या मल्टीबॅगर स्टॉकच्या लिस्टमध्ये आहे. या काळात त्याने त्याच्या गुंतवणूकदारांना 235 टक्के परतावा दिला आहे. बरं, हे काही एकमेव वर्ष नाही, जेव्हा या मल्टीबॅगर स्टॉकने उत्कृष्ट परतावा दिला आहे. रामा फॉस्फेट्सचा (Rama Phosphates) उत्तम परतावा देण्याचा इतिहास आहे.

एखाद्या व्यक्तीने या शेअरमध्ये 10 वर्षांपूर्वी गुंतवणूक केली असेल तर ती व्यक्ती आज श्रीमंत व्यक्ती असेल. पण गेल्या एक महिन्यापासून हा शेअर दबावाखाली आहे. 1 महिन्यात हा स्टॉक 400 रुपयांवरून 361 रुपयांपर्यंत खाली आला आहे. पण मागच्या वर्षाचा विचार केल्या, या शेअरने 235 टक्के परतावा दिला असून तो 108 रुपयांवरून 361 रुपयांपर्यंत वाढला आहे. त्याच वेळी, गेल्या 10 वर्षात हा शेअर 51 रुपयांवरून 362 रुपयांवर आला आहे. 10 वर्षात 610 टक्के परतावा दिला आहे. त्याच वेळी, गेल्या 19 वर्षांत हा स्टॉक 2 रुपयांवरून 362 रुपयांपर्यंत वाढला आहे आणि या काळात 18000 टक्के परतावा दिला आहे.

रामा फॉस्फेट्सचा (Rama Phosphates) इतिहास

आता जर आपण या शेअरच्या किमतीचा इतिहास पाहिला तर, जर एखाद्या गुंतवणूकदाराने एक वर्षापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याला आज 3.35 लाख रुपये मिळाले असते. दुसरीकडे, 5 वर्षांपूर्वी एखाद्याने त्यात 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याला 4.80 लाख रुपये मिळाले असते. दुसरीकडे, 10 वर्षांपूर्वी एखाद्याने 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याला 7.10 लाख रुपये मिळाले असते. दुसरीकडे, या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 19 वर्षांपूर्वी एखाद्याने 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याला 1.81 कोटी रुपये मिळाले असते.

दिग्गजांचे लक्ष

बाजारातील दिग्गजांच्या मते या शेअर्समध्ये आणखीही तेजी येऊ शकते. रामा फॉस्फेट्सचा शेअर गेल्या 8 महिन्यांत 300-400 रुपयांच्या श्रेणीत असल्याचे आयआयएफएल सिक्युरिटीजचे अनुज गुप्ता यांनी सांगितले. हा स्टॉक लाँग टर्मसाठी अतिशय चांगला असल्याचेही ते म्हणाले. आता शेअर बाजारात घसरण झाली तर 274 रुपयांच्या स्टॉप लॉससह स्टॉक खरेदी करा आणि 400-450 रुपयांचे शॉर्ट टर्म टारगेट ठेवा असा सल्ला त्यांनी दिला.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : मनोज जरांगे अन् पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर; कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ; नेमकं काय घडलं?

IPL 2024, GT vs RCB Live Score: पुनरागमन करताच मॅक्सवेलचा गुजरातला मोठा दणका! कर्णधार शुभमन गिलला धाडलं माघारी

Nashik News : 10 वर्षानंतर धुळ झटकली; म्हाडा प्रकरणातील प्रस्ताव तपासण्याच्या सूचना

Latest Marathi News Live Update : एमके स्टॅलिन यांच्या पत्नीकडून तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात प्रार्थना

Ulhasnagar Crime : मटका किंगच्या मुलावर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी जेरबंद ; इन्स्टाग्राम पोस्टमुळे अडकला जाळ्यात

SCROLL FOR NEXT