Patanjali 
अर्थविश्व

फक्त सहा महिन्यात 'पतंजली'ने मिळविला तब्बल 'इतक्या' कोटींचा महसूल!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : बाबा रामदेव यांच्या पंतजली आयुर्वेद उद्योगाने चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत 3 हजार 562 कोटी रुपयांचा महसूल मिळविला आहे. कंपनीला आतापर्यंत प्रथमच पहिल्या सहामाहीत एवढे मोठे उत्पन्न मिळाले आहे. 

कंपनीने एप्रिल ते जून या तिमाहीत 1 हजार 793 कोटी रुपये आणि जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत 1 हजार 769 कोटी रुपयांचा महसूल मिळविला आहे. कंपनीला मागील आर्थिक वर्षातील एप्रिल ते जून या तिमाहीत 937 कोटी आणि जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत 1 हजार 576 तोटी रुपयांचा महसूल मिळाला होता.

पतंजली आयुर्वेदने प्रथमच पहिल्या सहामाहीत एवढा मोठा महसूल मिळविला आहे, अशी माहिती पतंजलीचे प्रवक्ते एस. के. तिजारावाला यांनी दिली. दरम्यान, कंपनीने चालू आर्थिक वर्षातील निव्वळ नफा जाहीर केलेला नाही. 

आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये पतंजलीच्या व्यवसायात घसरण नोंदविण्यात आली होती. व्यवसायातील घसरणीसाठी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि बाबा रामदेव यांचे सहकारी आचार्य बाळकृष्ण यांनी नोटाबंदी आणि देशभर लागू करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवा कराला (जीएसटी) जबाबदार धरले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: महिला प्रवाशांसाठी मोठी बातमी! मुंबई लोकलमध्ये ‘पिंक कोच’ सुरू होणार; सुरक्षित प्रवासासाठी नवा उपक्रम

Beed Crime: परळीत अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार; दोन नराधमांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

Gas Cylinder Issue : ना आंघोळ, ना जेवण, गॅस साठी वणवण; गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांनी गाठले पोलीस ठाणे

Latest Marathi News Live Update : कुस्ती महासंघाच्या विरोधात ISWAI ची पुणे कोर्टात धाव

महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेसवे मिसिंग लिंक पूर्ण; पहिला ड्रोन व्हिडिओ आला समोर, उद्घाटनाची तारीख काय?

SCROLL FOR NEXT