Ratan-Tata 
अर्थविश्व

रतन टाटा हॉलिवूड स्टारपेक्षा कमी नाहीत; त्यांचा तरुणपणीचा फोटो पाहाच!

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : सुप्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा समूहाचे अध्वर्यू रतन टाटा यांनी सोशल मिडियावर धमाल उडवून दिली आहे. रतन टाटा यांनी अलीकडेच इन्स्टाग्राम या लोकप्रिय सोशल मीडियाशी जवळीक साधली आणि त्यांच्या जबरदस्त पोस्टच्या माध्यमातून रतन टाटांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

रतन टाटांच्या इन्स्टाग्राम वरील पोस्टवर नेटकऱ्यांच्या (इंटरनेट आणि सोशल मिडियावर सतत कार्यरत असणाऱ्या तरुणाईला नेटकरी असे संबोधण्यात येते) उड्या पडल्या आहेत. रतन टाटांच्या पाळीव प्राण्यांसोबत असलेल्या आणि भुरळ घालणाऱ्या फोटोंपासून ते उभारी आणि प्रेरणा देणाऱ्या किश्यांपर्यत सर्वच पोस्ट सोशल मिडियावर त्यांच्या पाठीराख्यांच्या कौतुकास पात्र ठऱल्या आहेत. रतन टाटांच्या पोस्टवर तरुणाईच्या उड्या पडत आहेत.

इन्स्टाग्राम हे साधन रतन टाटांसाठी जरी नवीनच असले तरी ते सोशल मिडियाचा वापर चटकन शिकून घेताना दिसत आहेत. अलीकडेच त्यांना #ThrowbackThurday या सोशल मिडियावरील ट्रेंडबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी टाकलेल्या पोस्ट बघितल्यावर या माध्यमावर रतन टाटांनी पकड मिळवल्याचे स्पष्ट दिसते आहे.

रतन टाटांनी आपल्या तरुणपणातील एक फोटो शेअर केला आहे. ते भारतात परतण्यापूर्वी जेव्हा अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये वास्तव्यास होते तेव्हाचा हा फोटो आहे. हा फोटो बघून ते रतन टाटाच आहेत हे पटकन लक्षातसुद्धा येत नाही. या फोटोबरोबरच त्यांनी काही ओळीदेखील पोस्ट केल्या आहेत.

मी कालच ही फोटो शेअर करणार होतो, मात्र मला Throwbackबद्दल कळाले आणि ते दर गुरुवारीच करतात असेही समजले. त्यामुळेच लॉस एंजेलिसमधील माझ्या वास्तव्याचे हे Throwback आहे. मी भारतात परतण्याच्या काही दिवसआधीच मी तेथे वास्तव्यास होतो.

रतन टाटांनी हा फोटो इन्स्टाग्राम टाकल्याबरोबर त्यांच्या चाहत्यांनी त्यांचे कौतुक करणाऱ्या कॉमेंटचा पाऊस पाडला आहे. रतन टाटा तरुणपणी किती रुबाबदार दिसत होते, ध्येय, दूरदृष्टी आणि उत्तम विनोदबुद्धी यांचा त्यांच्यात कसा मिलाफ झाला आहे, ते कसे रॉकिंग आहेत, ते उत्तम माणूस कसे आहेत, यासारख्या प्रतिक्रिया तरुणाई त्यांच्या पोस्टवर दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vasai Virar Election : वसई–विरार महापालिका निवडणुकीत माघारींचा धडाका; २८६ उमेदवार बाहेर; ५४७ रिंगणात!

Pune Political : उमेदवारी नाकारताच राष्ट्रवादी शरद पवार पक्षात खदखद; पुण्यात बैठकीत इच्छुकांचा गोंधळ!

Satish Bahirat : एकनिष्ठ कार्यकर्त्याच्या पक्षनिष्ठेची, पुन्हा एकदा चर्चा!

Tamhini Ghat Accident: 'त्याच' थारवर जाऊन कार कोसळली; ताम्हिणी घाटात पुन्हा तसाच अपघात, एकाचा मृत्यू

Paithan Political : उपनगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात; पैठणच्या राजकारणात उत्सुकता ताणली!

SCROLL FOR NEXT