RBI Monetary Policy Live Updates keeps interest rates unchanged
RBI Monetary Policy Live Updates keeps interest rates unchanged 
अर्थविश्व

रिझर्व्ह बँकेकडून रेपोदर 'जैसे थे'

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेने आज (गुरुवार) जाहीर केलेल्या पतधोरणात रेपो दर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रेपो दर आता 5.15 टक्क्यांवर कायम राहणार आहे. तसेच रिव्हर्स रेपो रेट 4.90 टक्क्यांवर कायम आहे

 रिझर्व्ह बँकेकडून गेल्या पत धोरणात 0.35 टक्क्याची कपात करण्यात आली होती.   रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली  रिझर्व्ह बँकेने आज आपले द्विमाही पतधोरण जाहीर केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

रेपो दर म्हणजेच बँकांना रिझर्व्ह बँकेकडून मिळणाऱ्या कर्जावर लागणारा व्याज दर. यामुळे बँकांना रिझर्व्ह बँकेकडून मिळणाऱ्या कर्ज दरात घट होत असल्याने त्याचा फायदा बँकांकडून कर्ज घेणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना होत असतो. आता मात्र रेपो दरात कपात न केल्याने कर्जाच्या हप्त्यांमध्ये काहीही बदल होणार नाही.

उदयनराजेंची राष्ट्रवादीच्या नेत्याकडे चुकल्याची कबुली

गेल्या पतधोरणात रेपो दरात 0.35 टक्क्याची म्हणजेच 35 बेसिस पॉईंट्सची कपात करण्यात आली आहे. विकासाची मंदावलेली वाढ आणि एनबीएफसीमधील गैरव्यवहारांमुळे लिक्विडीटी घटल्याने रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात कपातीची शक्यता व्यक्त करण्यात येत होती.

भारत आता मुस्लिमांचा देश राहिलेला नाही 

रेपो दर म्हणजे काय? 
रेपो दर म्हणजे ज्या दराने बॅंका रिझर्व बॅंकेकडून अल्पमुदतीची कर्जे घेतात तो दर. रेपो रेट वाढणं म्हणजे बॅंकांना रिझर्व बॅंकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणं;तर रेपो रेट कमी होणं म्हणजे बॅंकेला स्वस्तात कर्ज मिळणं. म्हणजेच रिझर्व्ह बॅंकेने रेपो रेट वाढवला तर पर्यायाने सर्व बॅंकांना ग्राहकांना द्यावयाच्या कर्जांचे दरही वाढवावे लागतात;तर हा दर कमी झाल्याने व्याज दर कमी होतो.

शिख दंगलीबाबत मनमोहन सिंग यांचा मोठा गोप्यस्फोट

रिव्हर्स रेपो दर म्हणजे काय? 
रिव्हर्स रेपो दर म्हणजे रेपो दराच्या अगदी उलट संकल्पना. बॅंका त्यांच्याकडील जास्तीचा निधी ठेवींच्या रूपात रिझर्व बॅंकेकडे जमा करतात. या ठेवींवर रिझर्व्ह बॅंक बॅंकांना देत असलेल्या व्याजदराला रिव्हर्स रेपो दर म्हणतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT