RBI Google
अर्थविश्व

महाराष्ट्रातील आणखी एका सहकारी बँकेचा परवाना रद्द; RBI ची कारवाई

गेल्या वर्षी देखील या बँकेची आर्थिक स्थिती पाहता आरबीआयने यावर निर्बंध लावले होते.

निनाद कुलकर्णी

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील आणखी एका सहकारी (Co-operative Bank ) बँकेवर रिझर्व्ह बँकेने कारवाई करत या बँकेचा परवाना रद्द करण्याचा आदेश दिला आहे. आरबीआयच्या (RBI) या निर्णयानंतर ग्राहकांना या बँकेच्या सुविधा आजपासून बंद करण्यात आल्या आहेत. दरम्यान, बँकेचा परवाना रद्द करण्याच्या निर्णयाचा फटका ग्राहकांना बसणार आहे. गेल्या वर्षी देखील या बँकेची आर्थिक स्थिती पाहता आरबीआयने यावर निर्बंध लावले होते. त्या निर्यणानुसार ग्राहक सहा महिने पैसे काढू शकत नव्हते. (RBI Ban On Co-operative Bank )

इंडिपेंडन्स को-ऑपरेटिव बँक लिमिटेड (Independence Co-operative Bank Ltd) असे परवाना रद्द करण्यात आलेल्या बँकेचे नाव असून, आरबीआयने याबाबत गुरुवारी नोटीफिकेशन जारी केले आहे. दरम्यान, कारवाई करण्यात आलेली सहकारी बँक नाशिक (Nashik) येथील असून, आरबीआयने ग्राहकांचे पैसे परत करण्यासंबंधीच्या सूचना देखील बँकेला दिल्या आहेत. त्यानुसार 99% खातेधारकांना त्यांची संपूर्ण रक्कम दिली जाणार आहे. बँकेच्या कारभारात काहीच सुधारणा न झाल्याने परवाना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आरबीआयने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT