३० नोव्हेंबरपूर्वी 'ही' कामे करणं महत्त्वाचं आहे, नाहीतर आर्थिक अडचण निर्माण होऊ शकते. esakal
अर्थविश्व

३० नोव्हेंबरपूर्वी 'ही' कामे करा, नाहीतर आर्थिक अडचणीत याल

या महिनाअखेर पर्यंत काही महत्त्वाची आर्थिक कामं करणं क्रमप्राप्त आहे.

सकाळ डिजिटल टीम

या महिनाअखेर पर्यंत काही महत्त्वाची आर्थिक कामं करणं क्रमप्राप्त आहे.

या महिनाअखेर पर्यंत काही महत्त्वाची आर्थिक कामं करणं क्रमप्राप्त आहे. एलआयसी हाऊसिंगच्या गृहकर्ज ऑफर, पेन्शनसाठीचे जीवन प्रमाणपत्र आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधीशी (UAN) संबंधित काही कामं ३० नोव्हेंबरपर्यंत करणं गरजेचं आहेत. तसे न केल्यास तुम्हाला आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागू शकते आणि तुमचे पैसेही अडकू शकतात. त्यामुळे नोव्हेंबर महिन्याचे उरलेले तीन दिवस सर्व वयोगटातील लोकांसाठी महत्त्वाचे आहे. महत्त्वाचं म्हणजे आज जरी रविवार असला, तरीही ही कामं ऑनलाईन करायची असल्यामुळे तुम्ही ती आजही करू शकता.

पेन्शनधारकांनी जीवन प्रमाणपत्र लवकरात लवकर सादर करावे-

पेन्शनधारकांना दरवर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते. याद्वारे संस्था पेन्शनधारक हयात असल्याची खात्री करतात. जर तुम्ही पेन्शनधारक असाल आणि अजूनही तुम्ही जीवन प्रमाणपत्र सादर केले नसेल, तर हे काम ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा, अन्यथा तुमची पेन्शन थांबू शकते. याशिवाय कर्मचारी पेन्शन योजनेशी (EPS) संबंधित निवृत्तीवेतनधारक वर्षातून एकदा त्यांचे जीवन प्रमाणपत्र ऑनलाइन सबमिट करू शकतात. सोप्या शब्दात समजून घ्यायचे झाले तर, जर तुम्ही जानेवारी २०२१ मध्ये जीवन प्रमाणपत्र सादर केले असेल, तर आता ते सादर करण्याची गरज नाही.

परवडणाऱ्या व्याजदरातील गृहकर्जासाठी अर्ज करा-

भारतीय आयुर्विमा महामंडळाचे LIC हाऊसिंग फायनान्स २ कोटी रुपयांपर्यंतच्या गृहकर्जासाठी ६.६६ टक्के सवलतीचा व्याजदर देत आहे. त्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२१ आहे. तुम्हालाही एलआयसी हाऊसिंगकडून स्वस्त दरात गृहकर्ज घ्यायचे असेल, तर दोन दिवसांत अर्ज करा. हा दर CIBIL स्कोअर ७०० किंवा त्याहून अधिक असलेल्या सर्व कर्जदारांना लागू आहे, मग त्यांचा व्यवसाय कोणताही असो. याशिवाय कंपनी प्रोसेसिंग फीमध्येही सूट देत आहे.

पॅनकार्ड आधारकार्डला लिंक करा-

तुम्ही जर तुमचे पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक केले नसेल तर लवकरात लवकर लिंक करून घ्या. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) युनिक खाते क्रमांक आणि आधार (UAN-Aadhaar Link) लिंक करण्याची मुदत ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी ती ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत होती. EPFO वेबसाइट, UMANG अॅप, EPFO ​​च्या e-KYC पोर्टलद्वारे OTP पडताळणी आणि बायोमेट्रिक क्रेडेन्शियल्सद्वारे आधार UAN शी लिंक केले जाऊ शकते. याशिवाय तुम्ही EPFO ​​कार्यालयात जाऊन देखील हे काम सोडवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meenatai Thackeray statue case Update: मोठी बातमी! मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्यास २४ तासांच्या आत अटक; गुन्हाही केला कबूल

Disha Patani’s house firing incident: दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सचा अखेर गाझियाबादमध्ये खात्मा!

Nagpur Crime : अपघाताच्या विम्याच्या कागदपत्रासाठी मागितले आठ हजार; उपनिरीक्षक, हेडकॉन्स्टेबल एसीबीचा जाळ्यात

Shital Mahajan : स्पेनमध्ये स्कायडायव्हिंग करून शीतल महाजन यांच्या पंतप्रधानांना शुभेच्छा

INDW vs AUSW: टीम इंडियाच्या नारी शक्तीचा ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियाचा वन डे क्रिकेट इतिहासात असा पराभव कुणी केलाच नव्हता...

SCROLL FOR NEXT