Mukesh-Ambani 
अर्थविश्व

रिलायन्स राईट्स इश्यूचे बाजारात दणक्यात आगमन

पीटीआय

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या राईट इश्यूची शेअर बाजारात जबरदस्त नोंदणी झाली आहे. रिलायन्सच्या राईट इश्यू शेअरची 690 रुपयांवर नोंदणी झाली आहे. कंपनीने निश्चित केलेल्या "बेस प्राईस'च्या 646 रुपयांच्या तुलनेत 690 रुपयांवर नोंदणी झाली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

रिलायन्स इंडस्ट्रीजचा राईट्स इश्यूला गुंतवणूकदारांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. कंपनीचा इश्यू 1.5 टक्के "ओव्हरसबस्क्राईब' झाला होता.

रिलायन्सचा राईट इश्यू 20 मे  ते 3 जून 2020 पर्यंत खुला होता.  या कालावधीत विद्यमान शेअरधारकांना राईट्स इश्यूमध्ये गुंतवणूक करता येणार होती. कंपनीने 14 मे "रेकॉर्ड डेट' म्हणून जाहीर केली होती. विद्यमान गुंतवणूकदारांना 15 शेअरमागे एक शेअर या प्रमाणात 1257 रुपयांना नवीन शेअर देण्यात आला होता. कंपनीने राईट इश्यूच्या माध्यमातून सुमारे 53 हजार 125 कोटी रुपयांचे भांडवल उभारले आहे. या माध्यमातून एकूण 42 कोटी 26 लाख शेअरची विक्री करण्यात येणार आहे. 

मुकेश अंबानींची 49.14 टक्के हिस्सेदारी
राईट इश्यूनंतर मुकेश अंबानींची रिलायन्समधील हिस्सेदारी 49.14 टक्क्यांवर पोचली आहे. मुकेश अंबानी कुटुंबियांनी राईट इश्यूमध्ये 28 हजार 286 कोटी रुपये ओतले आहे. रिलायन्सचा राईट इश्यूची RELIANCEPP या नावाने शेअर बाजारात नोंदणी झाली आहे. 

रिलायन्स इंडस्ट्रीजचे 25.4 लाख लहान गुंतवणूकदार (रिटेल शेअरहोल्डर) आहेत. तर 1700 संस्थात्मक गुंतवणूकदार (इन्स्टिट्युशनल) आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT