Mukesh Ambani Sakal
अर्थविश्व

Mukesh Ambani : अंबानींचा मास्टर प्लॅन! आता 'या' कंपनीत असणार रिलायन्सची हिस्सेदारी; शेअर्समध्ये...

मुकेश अंबानी यांनी अनेक नवीन व्यवसायांमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Mukesh Ambani Deal : रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक आणि आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आपला व्यवसाय सतत वाढवत आहेत. अलीकडे त्यांनी अनेक नवीन व्यवसायांमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.

आता त्यांचे लक्ष एका मोठ्या परदेशी कंपनीवर आहे. Thrive Capital असे या कंपनीचे नाव आहे. 2009 मध्ये जोश कुशनर यांनी याची सुरुवात केली होती.

ब्लूमबर्गने आपल्या अहवालात म्हटले आहे की, मुकेश अंबानी यांच्याशिवाय फ्रान्सचे झेवियर नील आणि ब्राझीलचे जॉर्ज पॉलो लेमन हे देखील थ्राईव्ह कॅपिटलमधील सुमारे 3.3 टक्के हिस्सेदारी खरेदी करण्याच्या शर्यतीत आहेत.

हेही वाचा : ...इथं बनतो आपला लाडका तिरंगा

कंपनीतील 3.3 टक्के हिस्सा खरेदी करण्याचाही त्यांचा विचार आहे. वॉल्ट डिस्नेचे सीईओ रॉबर्ट इगर आणि केकेआर अँड कंपनीचे संस्थापक हेन्री क्रॅव्हिस हे देखील या शर्यतीत आहेत.

अंबानी इतके दशलक्ष डॉलर्स खर्च करतील :

ब्लूमबर्गने अहवालात पुढे म्हटले आहे की, 'थ्राईव्ह कॅपिटलमधील 3.3 टक्के हिस्सा खरेदी करण्यासाठी मुकेश अंबानींना 175 दशलक्ष डॉलर खर्च करावे लागतील. या कराराचे मूल्य Thrive Capital 5.3 अब्ज डॉलर आहे.

वर्ष 2021 मध्ये, त्याचे मूल्य 3.6 अब्ज डॉलर होते. त्यावेळी कंपनीने गोल्डमन सॅक्स ग्रुपला काही स्टेक विकले होते. मात्र नंतर ते मागे घेण्यात आले.

मुकेश अंबानी श्रीमंतांच्या यादीत :

मुकेश अंबानी सध्या जगातील 12 वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांचा नेटवर्थ ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकाने 83.9 अब्ज डॉलर सांगितला आहे. ते आता इतर क्षेत्रातही व्यवसाय वाढवत आहे.

काही काळापासून ते जगातील टॉप 10 श्रीमंत लोकांच्या यादीत समाविष्ट होते. पण काही दिवसांपूर्वी त्यांना खूप नुकसान सहन करावे लागले आणि ते श्रीमंतांच्या यादीतून बाहेर पडले आहेत. गेल्या 24 तासांत त्यांचे 838 दशलक्ष डॉलरचे नुकसान झाले आहे.

थ्राईव्ह फर्मने कम्पास इंक, ओपेनडोर टेक्नोलॉजीज इंक, ऑस्कर हेल्थ इंक, सेलिब्रिटी किम कार्दशियां, हिम्स एंड हर्स हेल्थ इंक, यूनिटी सॉफ्टवेयर इंक, एफर्म होल्डिंग्स इंक यासह विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar Cabinet : नितीश कुमार मंत्रिमंडळात असणार दोन उपमुख्यमंत्री अन् २० मंत्र्यांचा समावेश!

Pune Politics : राज ठाकरेंनी अपमान केलेल्या अभिनेत्याचा भाजप प्रवेश

Angar Election: राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद का झाला? 'या' होणार बिनविरोध नगराध्यक्ष?

IND W vs BAN W: वर्ल्ड कप जिंकल्यानंतर होणारी भारतीय संघाची मालिका BCCI कडून स्थगित! जाणून घ्या सविस्तर

Ranji Trophy: महाराष्ट्राचा एकाच डावाने दणदणीत विजय; विकी ओत्सावल अन् राजवर्धन हंगारगेकरच्या मिळून ११ विकेट्स

SCROLL FOR NEXT