rs.jpg
rs.jpg 
अर्थविश्व

"पीपीएफ'धारकांना दिलासा..! नूतनीकरणाची वाढविली मुदत

संजय चव्हाण, नाशिक

नाशिक : सरकारने लॉकडाउनमुळे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) धारकांसाठीही दिलासादायक निर्णय घेतला आहे. ज्या पीपीएफ खातेदारांचा परिपक्वता कालावधी पूर्ण झाला आहे त्यांच्यासाठी नूतनीकरणाची मुदत 31 जुलैपर्यंत वाढवून देण्यात आली असून, असे न केल्यास अतिरिक्त बचतीच्या व्याजापासून त्यांना वंचित राहावे लागेल. 

खातेदारांसाठी सवलत
सर्वसाधारणपणे अवधी वाढविण्यासाठी पीपीएफ खात्याच्या परिपक्वतेच्या वर्षभराच्या आत अर्ज करावा लागतो. मात्र या वर्षी कोरोनामुळे लॉकडाउन जाहीर झाल्याने सरकारने अशा पीपीएफ खातेदारांसाठी ही वाढीव मुदतीची सवलत दिली आहे. ज्या ग्राहकांच्या खात्यांचा अवधी पूर्ण झाला आहे आणि हा अवधी वाढवून घ्यायची इच्छा असेल तर ते 31 जुलै 2020 पर्यंत अर्ज करू शकतात. 

नाहीतर व्याजास मुकावे लागणार
परिपक्वता अवधी संपलेल्या पीपीएफधारकांनी नूतनीकरणासाठी अर्ज केला नाही तर यानंतर बचत केलेल्या रकमेवरील व्याजास त्यांना मुकावे लागेल. पीपीएफ खातेदार नव्या बचतीसह पाच-पाच वर्षांच्या टप्प्याने 15 वर्षांपर्यंत मुदत वाढवू शकतो किंवा बचत न करता व्याज घेऊ शकतो. नव्या बचतीसाठी अर्ज करणे जरुरीचे असेल. मात्र असा अर्ज केला नाही तरी खात्यात असलेल्या जुन्या बचतीवर खाते बंद करत नाही तोपर्यंत त्याला व्याज मिळत राहील. 

`प्राप्तिकर`कडून करसवलत
खातेदाराला परिपक्वता अवधीनंतर केल्या गेलेल्या बचतीवर प्राप्तिकर कलम 80 सीअन्वये सवलतीच्या लाभासाठीदेखील अर्ज करावा लागेल. असे न केल्यास प्राप्तिकर विभागाकडून सूट मिळणार नाही. प्राप्तिकर विभागानेदेखील मागील आर्थिक वर्षात करसवलतीसाठी बचतीचा अवधी 31 जुलैपर्यंत वाढविला आहे. म्हणजेच करदाते या महिन्याअखेरपर्यंतच्या बचतीवरसुद्धा 2019-2020 साठी प्राप्तिकरात सूट मिळवू शकतील. 

पीपीएफ खात्याची वैशिष्ट्ये 
1. सध्याचा व्याजदर 7.10 टक्के 
2. परिपक्वतेनंतर काढलेली रक्कम टॅक्‍स फ्री 
3. प्राप्तिकर कलम 80 सीअन्वये दीड लाखाच्या बचतीपर्यंत सवलत 
4. दर तीन महिन्यांनी बदलते व्याजदर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: कल्याणमधून ठाकरे उमेदवार बदलणार? आणखी एक अर्ज दाखल झाल्यानं चर्चेला उधाण

Latest Marathi News Live Update : दक्षिण मुंबईतून शिवसेनेच्या यामिनी जाधव यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल

Aranmanai 4 Twitter Review: कुणी म्हणालं, 'ब्लॉकबस्टर' तर कुणी म्हणालं, 'जबरदस्त VFX'; तमन्नाच्या 'अरनमनई 4'नं जिंकली नेटकऱ्यांची मनं

Naach Ga Ghuma Review: 'ती' देखील वर्किंग वूमनच...? हास्य आणि भावनिक क्षणांची रोलर कोस्टर राईड

IND vs PAK T20 World Cup 24 : सामना भारत - पाकिस्तानचा फायदा न्यूयॉर्कच्या हॉटेल्सचा! तब्बल 600 टक्क्यांनी वाढलं रूम्सचं भाडं

SCROLL FOR NEXT