share market  google
अर्थविश्व

stock:2 रुपयांच्या स्टॉकने एक लाखाचे केले 37 कोटी...

शेअर बाजारात चांगल्या स्टॉक्समध्ये पैसे गुंतवल्यास कमी कालावधीत दमदार नफा कमावता येतो.

सकाळ डिजिटल टीम

शेअर बाजारात चांगल्या स्टॉक्समध्ये पैसे गुंतवल्यास कमी कालावधीत दमदार नफा कमावता येतो. पण त्यासाठी चांगल्या फंडामेंटल्स असणाऱ्या शेअर्समध्ये पैसे गुंतवणे गरजेचे आहे. गेल्या काही दिवसांत शेअर बाजारात मोठी उलथापालथ सुरु आहे,  गेल्या ट्रेडिंग आठवड्यात तर देशांतर्गत इक्विटी बेंचमार्क निर्देशांक 1 टक्क्यांहून अधिक घसरला, पण अशात आघाडीच्या बिगर बँकिंग फायनांशियल कंपनी (NBFC) बजाज फायनान्सच्या (Bajaj Finance) शेअर्सने चांगली कामगिरी केल्याचे समोर आले आहे.

गेल्या वर्षभराबद्दल बोलायचे झाले तर बजाज फायनान्सचे शेअर्स तीन टक्क्यांहून अधिक कमकुवत झाले आहेत, म्हणजेच त्यात चढ-उतार दिसून येत आहे. पण, जर आपण लाँग टर्मचा विचार केल्यास हा स्टॉक मल्टीबॅगर असल्याचे सिद्ध झाले आहे. बजाज फायनान्सने 24 वर्षात गुंतवणूकदारांचा पैसा 3681 पट वाढवला आहे.

एक लाखाचे 37 कोटी

18 एप्रिल 1996 रोजी बजाज फायनान्सच्य शेअर्सची किंमत 5.78 रुपयांवर होती, जी 21 ऑगस्ट 1998 रोजी दोन वर्षांनी 2.04 रुपयांवर गेली. पण 22 वर्षांनंतर, 23 सप्टेंबर 2022 रोजी त्याची किंमत बीएसईवर 7,509 रुपये झाली.

म्हणजेच एखाद्या गुंतवणूकदाराने 21 ऑगस्ट 1998 रोजी त्यात 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर ती आतापर्यंत 3681 पटीने वाढून सुमारे 37 कोटी रुपये झाली असती. मागच्या पाच वर्षांचा विचार केला तर या शेअरने गुंतवणूकदारांना 309 टक्के परतावा दिला आहे.

बजाज फायनान्स ही बजाज फिनसर्व्हची  (Bajaj Finserv) उपकंपनी आहे. ही कंपनी प्रामुख्याने दुचाकी आणि तीनचाकी वाहनांना कर्ज देण्यासाठी सुरू करण्यात आली होती. आधीचे नाव बजाज ऑटो फायनान्स होते जे 2010 मध्ये बदलून बजाज फायनान्स झाले. बजाज फायनान्स आरबीएल बँक आणि डीबीएस बँक यांच्या संयुक्त विद्यमाने को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड जारी करते.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

Igatpuri Tunnel Latest Update : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! इगतपुरी बोगदा 'या' वेळेत बंद राहणार, काय आहे कारण?

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

SCROLL FOR NEXT