rupee and dollar Sakal
अर्थविश्व

रुपया कोमात, डॉलर जोमात; भारतीय चलनाची आत्तापर्यंतची सर्वांत मोठी घसरण

विदेशी बाजारात अमेरिकन डॉलरच्या मजबूतीमुळे भारतीय चलनाची मोठी पडझड झाली आहे.

दत्ता लवांडे

नवी दिल्ली : विदेशी बाजारात अमेरिकन डॉलरच्या मजबुतीमुळे भारतीय चलनाची मोठी पडझड झाली आहे. सोमवारच्या सुरूवातीच्या सत्रात भारतीय चलन 52 पैशांनी घसरून तुलनेत अमेरिकन डॉलरची किंमत 77.42 वर पोहोचली आहे. ही आत्तापर्यंतची भारतीय चलनाची सर्वांत मोठी घसरण आहे.

(Indian Rupee Weakened Hit all Time Low Today)

परकीय चलन बाजारात, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 77.17 वर उघडला होता आणि नंतर 77.42 पर्यंत घसरला, मागील बंद किंमतीच्या तुलनेत 52 पैशांची घसरण झाली आहे. शुक्रवारी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया पुन्हा 55 पैशांनी घसरून 76.90 वर बंद झाला.

चलनवाढीच्या चिंतेमुळे गुंतवणूकदार जोखीम पत्करत नसल्याचं विदेशी चलन व्यापार्‍यांनी सांगितलं आहे. दरम्यान, सहा प्रमुख चलनांच्या तुलनेत अमेरिकन डॉलरची स्थिती दर्शवणारा निर्देशांक 0.35 टक्क्यांनी वाढून 104.02 वर पोहोचला आहे.

जागतिक बाजारात इंधनाचे भाव सतत वाढत असून ते आता 0.14 टक्क्यांनी वाढून $112.55 प्रति बॅरल झाले. शेअर बाजाराच्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी शुक्रवारी निव्वळ 5,517.08 कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT