SBI share news esakal
अर्थविश्व

SBI च्या शेअर्समध्ये 40टक्के वाढीची शक्यता! तुमच्याकडे आहेत का शेअर्स ?

स्टेट बँक ऑफ इंडिया त्यांची बॅलेन्सशीट मजबूत करण्यावर सतत भर देत आहे

शिल्पा गुजर

स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) शेअर्स त्यांच्या गुंतवणुकदारांना कधीही निराश करत नाही हे मागच्या काही वर्षांपासून समोर आले आहे. सध्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) त्यांची बॅलेन्सशीट मजबूत करण्यावर सतत भर देत आहे असे ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवाल यांचे म्हणणे आहे. सोबतच रिटर्न रेश्यो सुधारण्यावरही भर दिला जात आहे.

आरबीआयने व्याजदरात वाढ केल्यास एसबीआय तिच्या ट्रेझरी पोर्टफोलिओमधील एमटीएम (MTM) तोटा सहन करण्यास मजबूत स्थितीत असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. व्याजदर वाढीच्या या वातावरणात एसबीआय बँक तिच्या इतर सोबतीच्या बँकांच्या तुलनेत मजबूत स्थितीत आहे. हे लक्षात घेऊन, या स्टॉकचे बाय रेटिंग कायम ठेवताना, मोतीलाल ओसवालने त्यासाठी 675 रुपयांचे टारगेट दिले आहे. सध्याच्या किंमतीवरून एसआयबीच्या स्टॉकमध्ये 40 टक्के वाढ दिसून येऊ शकते.

गेल्या काही तिमाहीत अंडररायटिंगमध्ये सुधारणा झाल्यामुळे आणि रिकव्हरी टीमने केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे बँकेच्या ऍसेट क्वालिटीत सुधारणा झाल्याचेही मोतीलाल ओसवाल म्हणाले. शुक्रवारी हा एसबीआयचा शेअर NSE वर 5.45 रुपये अर्थात 1.11 टक्क्यांच्या वाढीसह Rs 492.25 वर ट्रेडिंग करत होता. या स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 549 रुपये आहे तर 52 आठवड्यांचा नीचांक 321.30 रुपये आहे. एका वर्षाच्या कालावधीत SBI च्या शेअर्समध्ये 37 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आणि या वर्षी आतापर्यंत हा शेअर 4 टक्क्यांनी वाढला आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maruti Cars: जीएसटी कमी झाल्यानंतर अल्टो, स्विफ्ट, डिझायर आणि वॅगनआरची किंमत किती असेल?

Prithvi Shaw : IPL 2026 मध्ये पृथ्वी शॉ CSK च्या ताफ्यात? ऋतुराज गायकवाडची मध्यस्थी? फ्रँचायझीने पोस्ट केला Video

न्यायालये ताकदवान नाहीत, हात बांधलेत असं आम्ही म्हणू का? सरन्यायाधीशांचा सरकारला सवाल

Diabetes in Kids: तुमच्या मुलांना डायबिटीजचा धोका आहे का? 'ही' ८ लक्षणे वेळेत ओळखून घ्या योग्य काळजी

Shivaji Maharaj: पुण्यातील मानाचा पहिला गणपती अन् शिवरायांचं बंधन! ; मावळे मोहिमेवर जाण्याआधी घेत असत बाप्पाचं दर्शन

SCROLL FOR NEXT