Share Market  esakal
अर्थविश्व

Share Market : बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज 'हे' 10 शेअर्स करतील परफॉर्म

यूएस फेडरल रिझर्व्हच्या कठोर भूमिकेचा बाजारावर परिणाम झाला.

सकाळ डिजिटल टीम

Share Market : कमजोर जागतिक ट्रेंडमुळे शुक्रवारी भारतीय बाजारात सलग तिसऱ्या दिवशी आणखी घसरण झाली. यूएस फेडरल रिझर्व्हच्या कठोर भूमिकेचा बाजारावर परिणाम झाला. सर्व सेक्टर्समध्ये विक्री झाल्याने आणि रुपया नवीन नीचांकी पातळीवर गेल्याने बाजाराने या वर्षातील सर्व नफा गमावला.

गेल्या आठवड्यात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये 1 टक्क्यांहून अधिक कमजोरी दिसून आली आहे. निफ्टी बँक, एनर्जी, मेटल, पीएसयू बँक आणि ऑटो प्रत्येकी 1-4 टक्क्यांनी घसरल्याने सर्व सेक्टर लाल रंगात बंद झाले.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

तांत्रिकदृष्ट्या निफ्टी 50-डीएमएच्या खाली बंद झाल्याचे स्वस्तिक इन्व्हेस्टमार्टचे संतोष मीना म्हणाले. यात बियरिश हेड अँड शोल्डर फॉर्मेशनमुळे ब्रेकडाउन दिसून येत आहे. जे आणखी कमजोरीचे संकेत देत आहेत. निफ्टी त्याच्याही खाली आल्यावर 17,150 वर सपोर्ट दिसतो. 17,000 च्या 200-DMA वरही मजबूत सपोर्ट दिसून येत आहे. दुसरीकडे, निफ्टीला 17,700 च्या 20-DMA वर रझिस्टंस दिसत आहे. निफ्टी 17,500 च्या पुट बेसच्या खाली घसरला आहे. यामध्ये, पुढील सपोर्ट 17000 वर दिसतो आहे.

लाँग टर्मसाठी बाजारात दबाव दिसत असल्याचे निफ्टीवर रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा म्हणाले. त्यामुळे बाजारात आणखी पडझड होण्याची चिन्हे आहेत. निफ्टीला पुढील सपोर्ट 17,100 वर मिळत आहे. बहुतेक सेक्टर बेंचमार्क इंडेक्सेससारखे व्यापार करत असल्याचे दिसत असल्याने, शॉर्ट पोझिशन्स ठेवणे समजुतीचे ठरेल असे ते म्हणाले.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

  • पॉवरग्रीड (POWERGRID)

  • हिन्दाल्को (HINDLACO)

  • अपोलो हॉस्पिटल्स (APPOLOHOSP)

  • अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)

  • एनटीपीसी (NTPC)

  • झी एन्टरटेन्मेंट (ZEEL)

  • भारत फोर्ज (BHARATFORG)

  • श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड (SRTRANSFIN)

  • आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTBANK)

  • ट्रेंट (TRENT)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"अपमान सहन करून ते कॉरिडॉरमध्ये बसून राहायचे" रंजनाच्या अपघातानंतर अशोक मामांच्या अवस्थेबद्दल खुलासा

Pune Fraud News : शेअर बाजारात चांगल्या परताव्याच्या आमिषाने ज्येष्ठाची दीड कोटींची फसवणूक

Rain-Maharashtra Latest Live News Update: ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्प- ईसापुर धरण पाणी पातळी वाढ

Online Gaming Bill 2025 : लोकसभेत 'ऑनलाइन गेमिंग विधेयक-२०२५' मंजूर!

Tirupati Balaji Temple : अशीही बालाजी भक्ती! तिरुपती मंदिरात भाविकाने दान केलं तब्बल १२१ किलो सोनं; किंमत ऐकून थक्क व्हाल....

SCROLL FOR NEXT