Ashok Leyland Stock  esakal
अर्थविश्व

Ashok Leyland Stock : अडीच वर्षात तीन पट वाढ, आता हा स्टॉक आणखी वाढण्याची शक्यता

गेल्या दोन दिवसांपासून विक्रीचा दबाव दिसून येत आहे. मात्र, पुढे तेजीचा कल असल्याचे बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Ashok Leyland Stock : अशोक लेलँड (Ashok Leyland) या ऑटो क्षेत्रातील दिग्गज कंपनीने गेल्या अडीच वर्षांत गुंतवणूकदारांच्या पैशांत तिप्पटीहून अधिक वाढ केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून विक्रीचा दबाव दिसून येत आहे. मात्र, पुढे तेजीचा कल असल्याचे बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे.

देशांतर्गत ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी अशोक लेलँडमध्ये (Ashok Leyland) गुंतवणुकीसाठी 185 रुपयांचे टारगेट निश्चित केले आहे. सध्याच्या किमतीच्या तुलनेत ते 24 टक्क्यांनी अधिक आहे. त्याचे शेअर्स बीएसईवर 149.35 रुपयांवर ट्रे़ड करत आहेत. त्याची मार्केट कॅप 43,851.06 कोटी रुपये आहे.

अशोक लेलँडचा कॉस्ट स्ट्रक्चर चांगला आहे आणि त्यांच्याकडे वाजवी कर्ज मिळत असल्याचे ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालच्या विश्लेषकांचे म्हणणे आहे. याशिवाय ट्रकच्या वॉल्यूंटरी स्क्रॅपिंगमुळे व्यावसायिक वाहनांची मागणी वाढेल, त्याचा फायदा अशोक लेलँडला होईल. त्यामुळेच यामध्ये 185 रुपयांच्या टारगेटसह गुंतवणूक करण्याचा सल्ला ब्रोकरेज फर्मने दिला आहे.

12% डिस्काउंटवर मिळतोय शेअर

या वर्षी 8 मार्च 2022 रोजी अशोक लेलँडचे शेअर्स 93.20 रुपयांवर होते, जे एका वर्षातील विक्रमी नीचांकी आहे. यानंतर खरेदीचा ट्रेंड आला आणि 6 सप्टेंबर 2022 पर्यंत, 82 टक्क्यांच्या वाढीसह, त्याची किंमत 169.40 रुपयांवर पोहोचली. गेल्या 52 आठवड्यांतील हा विक्रमी उच्चांक आहे. यानंतर, शेअर्सचा तेजीचा ट्रेंड थांबला आणि आता हा शेअर 149.35 रुपयांवर आहे, जी एका वर्षाच्या विक्रमी उच्चांकावरून 12 टक्क्यांनी सवलत आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

SCROLL FOR NEXT