Share Market  sakal
अर्थविश्व

Share Market : कोरोनामुळे शेअर बाजारात मोठी घसरण; 'हे' 3 शेअर स्वस्तात खरेदी करण्याची मोठी संधी

चीनमध्ये वाढत्या कोरोनाचा सर्वाधिक परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे.

सकाळ डिजिटल टीम

पुन्हा एकदा कोरोना झपाट्याने पसरत आहे. कोविडचे सर्वाधिक रुग्ण चीनमध्ये आहेत. चीनशिवाय ब्राझील आणि अमेरिकेतही कोरोनाच्या नवीन व्हेरियंटमुळे रुग्ण वाढत आहेत. भारतातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली.

गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान, चीनमध्ये वाढत्या कोरोनाचा सर्वाधिक परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे. घसरणीचा कल सलग चौथ्या दिवशीही कायम आहे.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

'मंदी'मुळे चौथ्या दिवशी अमेरिकन शेअर बाजारात तेजी, भारतावर काय परिणाम होणार?

1 डिसेंबर रोजी बाजाराने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. निफ्टीने 1 डिसेंबर रोजी 18800 ची पातळी ओलांडली होती. जी आता 18000 च्या आसपास खाली आली आहे. दुसरीकडे, सेन्सेक्स सुमारे 3000 अंकांनी घसरल्यानंतर 60500 च्या आसपास व्यवहार करत आहे.

बाजारातील घसरणीच्या वेळी बहुतेक किरकोळ गुंतवणूकदार घाबरतात आणि शेअर्स विकतात, तर काही लोक ही संधी शोधतात, ते घसरणीत खरेदी करतात. या घसरणीच्या काळात तज्ज्ञांनी अनेक समभाग खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

Mphasis

लक्ष्य - रु 2,500

ब्रोकरेज एम्के ग्लोबलच्या मते, एमफेसिस शेअरमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या हा शेअर 1970 रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहे आणि हा शेअर 2500 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. म्हणजेच, स्टॉक 20 टक्क्यांहून अधिक वाढू शकतो. कारण तिसऱ्या तिमाहीपेक्षा चौथ्या तिमाहीत कंपनीचा व्यवसाय चांगला राहण्याची अपेक्षा आहे.

Venus Pipes 
लक्ष्य-रु.905

सध्या व्हीनस पाईप्सचा शेअर 905 रुपयांवर आहे. जो सध्या रु.730 च्या आसपास व्यवहार करत आहे. या समभागाने गेल्या एका वर्षात 100% पेक्षा जास्त परतावा दिला आहे.

Apollo Hospitals 
लक्ष्य - रु 5,470

कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये, कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने अपोलो हॉस्पिटलचे शेअर्स विकत घेण्याचा सल्ला दिला आहे. कंपनीचा नफा हळूहळू वाढत आहे. सध्या अपोलो हॉस्पिटलचे शेअर्स रु.4,792 वर व्यवहार करत आहेत. तर स्टॉकचे लक्ष्य 5,470 रुपये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rekha Gupta : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर जीवघेणा हल्ला, जनता दरबार सुरु असताना हल्लेखोर आला अन्...

Satara Rain update:'कराड-पाटण तालुक्यात मुसळधार; कराड-चिपळूण मार्ग वाहतूक बंद, अडकलेले कोकणात जाणारे 150 प्रवासी एसटी बसमधून रवाना

HDFC Bank Alert: HDFC ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; बँकेच्या अत्यावश्यक सेवा दोन दिवस बंद राहणार

Dhanashree Verama: युझवेंद्र चहलच्या 'Sugar Daddy' टी शर्टवर धनश्रीची जोरदार टीका; म्हणाली, मी कोर्टात रडले आणि तो...

Pune Rain Update: पुण्यात पावसाचा हाहाकार! एकता नगरमध्ये पाणी शिरलं, खडकवासल्यातून विसर्ग वाढला

SCROLL FOR NEXT