share market google
अर्थविश्व

Share market : शेअर बाजारात तेजी; दिवसभर सेन्सेक्स आणि निफ्टी वधारलेलाच

निफ्टीमध्ये २२९.३० अंकांची म्हणजेच १.४३ टक्क्यांची वाढ झाली आहे.

नमिता धुरी

मुंबई : आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्समध्ये ७६०.३७ अंकांची म्हणजेच १.४१ टक्क्यांची वाढ झालेली दिसून आली. त्यामुळे सेन्सेक्स ५४,५२१.१५ अंकांवर स्थिर झाला. निफ्टीमध्ये २२९.३० अंकांची म्हणजेच १.४३ टक्क्यांची वाढ झाली आहे. यामुळे निफ्टी १६,२७८.५० अंकांवर स्थिरावला.

बाजार सुरू होताना शेअर बाजारात तेजी दिसून आली. सेन्सेक्स ४४२.७७ अंकांनी म्हणजेच ०.८१ टक्क्याने वधारला व ५४,१९५.३१ अंकांवर स्थिर झाला. निफ्टी १३६.३५ अंकांनी म्हणजेच ०.८४ टक्क्यांनी वधारला व १६.१८२.९५ अंकांवर स्थिर झाला.

सलग ४ दिवसांच्या घसरणीला फाटा देत शुक्रवारी शेअर बाजारात तेजी दिसून आली होती. ऑटो, कॅपिटल गुड्स आणि एफएमसीजी शेअर्समध्ये चांगली वाढ दिसून आली होती. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 344.63 अंकांच्या म्हणजेच 0.65 टक्क्यांच्या वाढीसह 53,760.78 वर बंद झाला होता तर, दुसरीकडे, निफ्टी 110.55 अंकांच्या म्हणजेच 0.69 टक्क्यांच्या वाढीसह 16,049.20 वर बंद झाला होता.

बाजारात पुन्हा एकदा अस्थिरता परतत असल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले. अमेरिकेतील वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर आता गुंतवणूकदारांचे लक्ष यूएस फेडच्या धोरणावर आहे.

कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घसरण आणि एफआयआयच्या विक्रीतील नरमाईमुळे देशांतर्गत बाजारातील अपेक्षा काही प्रमाणात वाढताना दिसत आहेत. मात्र, जागतिक मंदीची भीती आणि आयटी क्षेत्राचे आतापर्यंतचे कमकुवत परिणाम आणि रुपयाचे अवमूल्यन यामुळे बाजारावर दबाव निर्माण झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramraje Naik-Nimbalkar: नार्को चाचणी त्यांची त्यांनीच करावी: रामराजे नाईक-निंबाळकर; एकाही घटनेच्या मागे मी आहे, सिद्ध करून दाखवा

तुम्हाला अतिवृष्टीची भरपाई मिळाली नाही का? शेतकऱ्यांनी ‘येथे’ तातडीने काढावा फार्मर आयडी; सोलापूर जिल्ह्यातील ४.९० लाख शेतकऱ्यांना ४९८ कोटींची भरपाई अजूनही मिळाली नाही

७ नोव्हेंबरपासून मुंबईला दररोज विमान! डिसेंबरमध्ये गोव्यालाही सोलापुरातून दररोज विमान; गृह विभागाकडून मिळेना पोलिसांचे मनुष्यबळ, पोलिस ठाण्याचाही प्रस्ताव धुळखात

अग्रलेख : पाणी वाहते झाले...

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात १५ मिनिटांत बनवा ओट्स अन् एग ऑमलेट,सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT