Todays Share Market Updates
Todays Share Market Updates sakal
अर्थविश्व

Share Market: शेअर बाजारात आजही अस्थिरता, विक्रीवर दबाव कायम

सकाळ डिजिटल टीम

share market update: आठवड्याभरापासून शेअर बाजारात अस्थिरता आहे. आजही शेअर बाजारात चढ उतार दिसून आला. सुरवातीच्या सत्रात बाजार तेजीसह सुरू झाला मात्र अखेरच्या सत्रात शेअर बाजारात घसरण दिसून आली. सेन्सेक्स 100 अंकाच्या घसरणीसह 53,416 वर बंद झाला तर निफ्टी 30 अंकाच्या घसरणीसह 15,938 वर बंद झाला. (share market closing update 14 july 2022)

आज १९ शेअर्समध्ये मध्ये तेजी दिसून आली तर तब्बल ३० शेअर्समध्ये घसरण दिसून आली. यात प्रामुख्याने बँकिंग अन् आयटी शेअर्समध्ये घसरण दिसून आली. विशेष म्हणजे HDFC, RELIANCE, TCS, COALINDIA, TATAMOTORS या पाच मोठ्या शेअर्समधील घसरण अधिक लक्षणीय आहे.

आज सुरवातीच्या सत्रात सेन्सेक्स 214अंकाच्या तेजीसह 53,728वर सुरू झाला तर निफ्टी 72 अंकाच्या तेजीसह 16,038 वर सुरू झाला.

आयटी, गॅस आणि पॉवर शेअर्समध्ये झालेल्या विक्रीमुळं शेअर बाजार (Share Market) बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी घसरणीसह बंद झाला होता. अमेरिकेतील (America) महागाईच्या आकडेवारीची भीतीही बाजारात दिसून आली. सेन्सेक्स 372.46 अंकांनी म्हणजेच 0.69 टक्क्यांनी घसरून 53, 514.15 वर बंद झाला होता. निफ्टी 91.60 अंकांनी म्हणजेच 0.57 टक्क्यांनी घसरून 15,966.70 वर बंद झाला होता.

देशांतर्गत स्टॉक मार्केटमधून सतत विदेशी कंपन्यांचं बाहेर पडत आहेत तसेच अमधूनमधून डॉलरच्या विक्रीचं प्रमाण वाढल्यानं त्याचा परिणाम रुपयाच्या अवमुल्यनावर झाला आहे. त्यामुळे त्याचा थेट परिणाम बाजारावर दिसून येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSC Exam Result : बारावीचा निकाल २.१२ टक्क्यांनी वाढला; कोकण विभागाचा सर्वाधिक ९७.५१

Narendra Modi : ... तर नेहरूंनी आरक्षणच दिले नसते

Pune News : विशाल अग्रवालसह चार जणांना अटक

Azamgarh Loksabha Election : ‘सप’च्या बालेकिल्ल्यात दोन यादवांमध्ये लढाई; धर्मेंद्र यादव विरुद्ध दिनेशलाल निरहुआ

Milind Deora : उद्धव ठाकरेंमुळे काँग्रेस पक्ष सोडला

SCROLL FOR NEXT