Share Market News Sakal
अर्थविश्व

RBI च्या रेपो दरात वाढ अन् शेअर बाजार कोसळला

गेल्या काही दिवसापासून शेअर बाजारात घसरण सुरु आहे.

सकाळ डिजिटल टीम

गेल्या काही दिवसापासून शेअर बाजारात घसरण सुरु आहे. आज या घसरणीला ब्रेक करत सेन्सेक्स 78 अंकांच्या तेजीसह 55,185 वर तर निफ्टी 28 अंकांच्या तेजीसह 16,444 वर उघडला होता मात्र आता पुन्हा काही क्षणातच शेअर मार्केटमध्ये घसरण दिसून आली. हीच घसरण शेवटच्या सत्रापर्यंत कायम होती. आज शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स 214 अंकानी घसरुन 54,830 वर बंद झाला तर निफ्टीतही 60अंकाची घसरण होत 16.360 वर बंद झाला.

मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशीही भारतीय शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली होती. रिझव्‍‌र्ह बँकेकडून व्याजदरात वाढ होण्याची भीती बाजारावर कायम होती. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 567.98 अंकांनी म्हणजेच 1.02 टक्क्यांनी घसरून 55,107.34 वर बंद झाला होता. तोच निफ्टी 153.20 अंकांनी म्हणजेच 0.92 टक्क्यांनी घसरून 16416.35 वर बंद झाला होता.

भारतीय रिझर्व बँकेने आज आपलं नवं पतधोरण जाहीर केलं आहे. यामध्ये बँकेने पुन्हा एकदा रेपो दरात ०.५० टक्क्यांची वाढ केली आहे. महिन्याभरातली ही दुसरी वाढ आहे. यामुळे आता रिझर्व बँकेचा रेपो दर ४.९० टक्के झाला आहे.

रिझर्व बँकेने रेपो दरात वाढ केल्याने आता सर्वसामान्यांसाठी कर्ज महाग होणार आहेत. कारण आता बँकांच्या कर्जाची किंमत वाढणार आहे. रेपो रेट हा असा दर आहे, ज्या दराने बँका रिझर्व बँकेकडून पैसे घेतात. हा दर वाढल्याने आता बँकांना जास्त दराने कर्ज मिळणार आहे. त्यामुळे बँका ग्राहकांकडून चढ्या दराने व्याज घेणार आहेत.

बाजारातील अस्थिरता RBI पॉलिसीआधी गुंतवणूकदारांना बाजारापासून दूर राहण्यास भाग पाडत असल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले होते. बाजाराने रेपो दर आणि CRR मध्ये 50 बेसिस पॉइंट्स वाढ झाल्यानंतर लिक्विडिटीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जर आपण कोणतेही पाऊल उचलले तर त्याचा परिणाम बाजारावर दिसून येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif vs Shivaji Patil : 'शिवाजीराव मुक्त गोकुळ त्यांना करायचे का?' महायुतीच्या गोकुळमधील पॅनेलवर आमदार शिवाजी पाटलांनी केले वक्तव्य

Latest Marathi News Live Update : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी

Pune Crime: 'माझा गुन्हा का दाखल केला नाही?' संतापलेल्या महिलेचा पोलिस चौकीत धिंगाणा, वैद्यकीय अहवालात मोठा खुलासा

Mumbai : पावसाने रस्ते निसरडे झाले, अपघातामुळे वाहनांच्या रांगा; तर ओव्हर हेड वायर तुटून मध्य रेल्वेचाही खोळंबा

Accident News : मध्यरात्री भीषण अपघात ! कार ५०० मीटर खोल दरीत कोसळली, ८ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT