Share Market
Share Market  sakal
अर्थविश्व

Share Market : गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! 'या' स्मॉलकॅप कंपनीने डिव्हिडेंड केला जाहीर, शेअरमागे मिळणार...

सकाळ डिजिटल टीम

Share Market : इलेक्ट्रिक इक्विपमेंट इंडस्ट्रीतील स्मॉल-कॅप कंपनी, सर्व्होटेक पॉवर सिस्टम्सच्या (Servotech Power Systems) बोर्डाने आपल्या गुंतवणूकदारांसाठी डिव्हिडेंड जाहीर केला आहे.

कंपनी तिच्या भागधारकांना प्रति इक्विटी शेअर 0.20 रुपये डिव्हिडेंड देईल. कंपनी 1:5 च्या प्रमाणात स्टॉक स्प्लिट करणार आहे. याचा अर्थ असा की भागधारकाचा एक शेअर विभाजनानंतर पाचमध्ये रुपांतरीत होईल.

कंपनीने त्यांच्या शेअर्सना फेस व्हॅल्यू 10 रुपये प्रति इक्विटी शेअर्स 2 रुपये प्रति इक्विटी शेअर या दराने स्प्लिट करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने यासाठी रेकॉर्ड डेट 3 फेब्रुवारी निश्चित केली आहे.

कंपनी भारतात त्याचे चॅनल डिस्ट्रिब्यूशन नेटवर्क विस्तारत आहे. कंपनीने डिसेंबर 2022 ला संपलेल्या तिमाहीत 1500 हून अधिक ईव्ही चार्जर प्रदान करण्याचा टप्पा गाठला आहे.

कंपनीने आंतरराष्ट्रीय व्यापार बाजारपेठेत विस्तार केला आहे आणि कम्पोर्ट विकसित केले आहे जे एक सोलर परफॉर्मंस मॉनिटरिंग डिव्हाइस असल्याचे सांगितले.

कंपनीने लि-आयन आणि ट्यूबलर बॅटरी मेकर टेकबॅक जोडण्याव्यतिरिक्त आणि डिव्हिडेंड आणि स्टॉक स्प्लिटची अंमलबजावणी करण्याव्यतिरिक्त तिस-या तिमाहीत मजबूत कामगिरी केली.

हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना लाँग तसंच शॉर्ट टर्ममध्ये जबरदस्त परतावा दिला आहे. गेल्या एका महिन्यात हा शेअर जवळपास 40 टक्क्यांनी वाढला आहे.

गेल्या 6 महिन्यांबद्दल बोलायचे तर त्यात 273 टक्क्यांनी वाढ झाली आहे. इतकेच नाही तर या शेअरने गेल्या 5 वर्षांत 779 % परतावा दिला आहे.

या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांची रक्कम 15 महिन्यांत 9 पटीने वाढली आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये, सर्व्होटेकच्या एका शेअरची किंमत 19.05 रुपये होती, जी आज प्रति शेअर 221.60 रुपये झाली आहे.

याचा अर्थ 15 महिन्यांत गुंतवणूकदारांच्या पैशात जवळपास 11.5 पट वाढ झाली आहे. जर तुम्ही ऑक्टोबर 2021 मध्ये या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज तुमची रक्कम सुमारे 11.5 लाख रुपये झाली असती.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi Death: इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या हेलिकॉप्टर अपघातामागे षडयंत्र आहे का, नेमकं काय घडलं? इस्रायलच्या भूमिकेबाबत मोठा दावा!

Rohit Sharma : क्रिकेटपटूंची गोपनीयता जपा! ; मुंबई इंडियन्सचा खेळाडू रोहित शर्मा आयपीएल ब्रॉडकास्टरवर भडकला

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान

Kalyan News: देशाच्या विकासासाठी मतदार महायुतीच्याच बाजूने, विश्वनाथ भोईरांचे वक्तव्य

Akshay Kumar : अक्षयचा दिलदारपणा; जॉली एलएलबीचं शूटिंग पूर्ण होताच केली 500 मुलींना मदत

SCROLL FOR NEXT