Share Market sakal
अर्थविश्व

Share Market : दिवाळीपासून घेण्याचे आर्थिक धडे

दिवाळीचे प्रत्येक बाबतीतील नियोजन हे आपण आधीपासूनच करीत असतो.

अक्षय साबळे

रांगोळी, पणत्या, दिव्यांची आरास, मिठाई, फराळ, सजावट या सर्व गोष्टी दिवाळीतील वातावरण उत्साहवर्धक बनवतात. या सकारात्मकतेबरोबरच हा दिव्यांचा उत्सव आपल्याला काही महत्त्वाचे आर्थिक धडेही देतो. त्यामुळे लक्ष्मीपूजनासाठी तयारी करीत असताना ती उपासना प्रत्यक्षात आणण्यासाठी आपण काय प्रयत्न करतो, हे महत्त्वाचे आहे.

दिवाळीपासून आपल्याला मिळणारे काही आर्थिक धडे पुढीलप्रमाणे :

आर्थिक नियोजनाचे व्यवस्थापन करा

दिवाळीचे प्रत्येक बाबतीतील नियोजन हे आपण आधीपासूनच करीत असतो. आर्थिक नियोजनाबाबत हे असेच असायला हवे. आपले उद्दिष्ट सहजतेने गाठण्यासाठी गुंतवणुकीचे नियोजन हे आधीच करणे गरजेचे आहे. दिवाळीआधी आपण आपले घर व कार्यालयाची साफसफाई करायला घेतो आणि नको असलेल्या गोष्टी टाकून देतो. हाच दृष्टीकोन गुंतवणुकीच्या बाबतीतही प्रत्यक्षात आणणे गरजेचे आहे. गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओवर नजर टाकून गुंतवणुकीच्या ज्या योजना चांगली कामगिरी करीत नाहीत, अशांना बदलावे किंवा त्यांचे पुनर्संतुलन करावे. तुमची गुंतवणूक तुमच्या उद्दिष्टांशी सुसंगत आहे का आणि प्रत्येक गुंतवणुकीसाठी आपल्या जवळच्या कुटुंबियाला नामांकित केले आहे का, याची खात्री करा.

ज्ञानाचा दिवा लावा :

दिवे लावल्याने आपल्या भवतालचा अंधार दूर होतो; त्याचप्रमाणे पैसे आणि गुंतवणुकीबाबत आपले अज्ञान किंवा या गोष्टींना गृहीत धरणे दूर करा व योग्य आर्थिक ज्ञानाने जीवन उजळवा. पैशाबाबतच्या भीतीवर मात करा व स्वत:च्या आर्थिक नियोजनाची जबाबदारी गांभीर्याने घ्या. रोकड तरलता, गुंतवणुकीचे पर्याय, तुमच्या उद्दिष्टांसाठी गुंतवणुकीची साधने कशी निवडावी, आदींबाबत जाणून घेणे गरजेचे आहे आणि ही सकारात्मक बाब तुम्हाला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत करेल.

गुंतवणुकीमध्ये वैविध्य आणा :

दिवाळीच्या आनंदोत्सवामध्ये मिळणारी विविधता तुम्हाला आवडते ना? फराळामध्ये गोड, चटपटीत, रूचकर आणि स्वादिष्ट पदार्थ असतात. त्याचप्रमाणे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये योग्य त्या वैविध्यामुळे विविध आर्थिक साधनांद्वारे मिळणाऱ्या फायद्यांचा आनंद तुम्ही घेऊ शकता. वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ तुमच्या आर्थिक उद्दिष्टांच्या आधारे इक्विटी आणि डेट यासारख्या विविध मालमत्ता वर्गांमध्ये गुंतवणूक करून जोखीम आणि लाभ यामध्ये योग्य ते संतुलन साधण्यास मदत करू शकतो.

सोन्यामध्ये गुंतवणूक करा :

दिवाळी हा वर्षातील असा काळ असतो, की लोक या सोन्यासारख्या राजधातूची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी करतात. सोने हे शुभ मानले जाते आणि त्याच्या सौंदर्यमूल्यासाठी विकत घेतले जाते. या दिवाळीत शुद्ध सोन्याबरोबरच, गोल्ड म्युच्युअल फंड किंवा गोल्ड बाँड या पर्यायांचा पण विचार करा. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ही एक कमी जोखमीची भर असेल. एक मालमत्तावर्ग म्हणून सोन्याची स्थिरता गेल्या काही वर्षांत काळाच्या कसोटीवर टिकली आहे.

तुमच्या घरातील लक्ष्मीला सक्षम करा :

आज भारतात फक्त ३३ टक्के महिला स्वतंत्र आर्थिक निर्णय घेतात, असे एका पाहणीत आढळले आहे. आपण महिला आहोत म्हणून पैसे हा आपला विषय नाही, असा काहीसा समज झाला आहे आणि त्यामुळे ‘पैशाबद्दल बोलू नका’ हा एक अलिखित नियम झाला आहे. या दिवाळीला सुख-समृद्धीसाठी लक्ष्मीची प्रार्थना करीत असताना, तुमच्या स्वत:च्या कुटुंबातील लक्ष्मीकडे लक्ष द्या. मग ती तुमची आई, बहीण असो किंवा पत्नी असू दे. त्यांना आर्थिक स्वातंत्र्याच्या सामर्थ्यासाठी सक्षम करा.

( प्रीती राठी गुप्ता - लेखिका आनंद राठी शेअर अँड स्टॉक ब्रोकर्स लि. च्या व्यवस्थापकीय संचालक आणि प्रवर्तक आहेत. तसेच त्या 'लक्ष्मी' या खास महिलांसाठीच्या आर्थिक प्लॅटफॉर्मच्या संस्थापिका आहेत )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रिकेटचा देव 'सचिन' जेव्हा फुटबॉलचा सुपरस्टार मेस्सीला भेटला, 10 नंबरची जर्सी देताना काळ थांबला… वानखडेवरील 'तो' क्षण Viral

Latest Marathi News Live Update: स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी वानखेडे स्टेडियममधून रवाना

Baramati Politics:'बारामतीत राष्ट्रवादी व भाजपचे परस्परांवर आरोप प्रत्यारोप'; उपमुख्यमंत्र्यांच्या घरासमोरील आंदोलनाचे उमटले राजकीय पडसाद..

Google Search : रात्रीच्या वेळेस पुरुष गुगलवर सगळ्यात जास्त काय सर्च करतात? 2025 च्या नव्या रिपोर्टने दुनिया हादरली

Raju Shetti: शक्तीपीठ महामार्ग रेटण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा अटापिटा: राजू शेट्टींचा आरोप; टेंडरसाठी बड्या कंपन्यांकडून घेतला ॲडव्हान्स ?

SCROLL FOR NEXT