Share Market Latest Updates, Share Market Tips in Marathi , Share Market Guidance in Marathi  Sakal media
अर्थविश्व

Share Market: शॉर्ट टर्ममध्ये पैसे कमवायचेत? एक्सपर्टने निवडला हा शेअर...

गुंतवणूकदारांना सध्या शेअर बाजारात पैसे गुंतवण्यासाठी सुवर्णसंधी आहे.

शिल्पा गुजर

Share Market Ivestment: गुंतवणूकदारांना सध्या शेअर बाजारात पैसे गुंतवण्यासाठी सुवर्णसंधी आहे. तुम्ही आता शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल किंवा चांगला स्टॉक शोधत असाल तर मार्केट एक्सपर्ट संदीप जैन यांच्या सल्ल्याने खरेदी करू शकता. संदीप जैन यांनी गुंतवणूकदारांसाठी मजबूत स्टॉक निवडला आहे. संदीप जैन यांनी गुंतवणूकदारांना व्हीएसटी टिलर्स ट्रॅक्टरमध्ये (VST Tillers Tractors) पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला आहे. या शेअरबाबत संदिप जैन यांना विश्वास आहे. (Share Market Tips in Marathi)

ही कंपनी अनेक वर्षांपासून आपल्या बॅलेन्सशीट आणि फंडामेंटल्स सांभाळत आहे. कंपनीने आपला व्यवसाय 20 हून अधिक देशांमध्ये वाढवला आहे. कंपनीचे फंडामेंटल्सही उत्कृष्ट आहेत.

व्हीएसटी टिलर्स ट्रॅक्टर (VST Tillers Tractors)
सीएमपी (CMP) - 2441.05 रुपये
टारगेट (Target)- 2890/2980 रुपये

कंपनीचे फंडामेंटल्स?
हा स्टॉक 20-21 च्या मल्टिपलवर काम करत असल्याचे एक्सपर्ट संदीप जैन यांनी सांगितले. कंपनीचा रिटर्न ऑन इक्विटी 14-15 टक्के आहे. गेल्या 3 वर्षातील नफ्याचा CAGR 25% आहे. मार्च 2021 मध्ये कंपनीने 17 कोटी रुपयांचा नफा सादर केला होता, तर मार्च 2022 मध्ये कंपनीने 22 कोटी रुपयांचा नफा सादर केला होता.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT