Share-Market
Share-Market sakal media
अर्थविश्व

Share Market : आयकीओ लाइटनिंग कंपनीचा आयपीओ, सेबीकडे कागदपत्र सादर

सकाळ डिजिटल टीम

IKIO Lighting : आयकीओ लाइटनिंग कंपनी हा आता आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे. यासाठी कंपनीने सेबीकडे अर्ज सादर केला आहे. कंपनी एकूण 425 कोटी रुपयांचा आयपीओ आणत आहे. त्याचा 350 कोटी रुपयांचा फ्रेश इश्यू आणि 75 कोटी रुपयांची ऑफर फॉर सेल आहे. कंपनीचे प्रमोटर हरदीप सिंग आणि सुरमीत कौर हे त्यांचे स्टेक ऑफर फॉर सेलद्वारे (OFS) विकणार आहेत.

निधी कुठे वापरणार ?

आयकीओ लाइटनिंग (IKIO Lighting) त्यांच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी 50 कोटी रुपये वापरेल. कंपनीच्या पूर्ण मालकीच्या उपकंपनी - आयकीओ सोल्युशन्ससाठी नोएडामध्ये नवीन प्लांट उभारण्यासाठी 236.68 कोटी वापरण्यात येणार आहेत. याशिवाय बाकी निधी कॉर्पोरेट व्यवहारांसाठी वापरला जाईल.

आयकीओ लाइटनिंगच्या आयपीओपैकी 50% क्वालीफाइड इंस्टीट्यूशनल बायर्स (QIB) राखीव आहेत. तर 15% नॉन-इंस्टीट्यूशनल बायर्स (NII) आणि बाकी 35% रिटेल इंडिव्हिजुअल्ससाठी राखीव आहे. मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट ऍडव्हायझर्स हे आयपीओचे एकमेव बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत. आयकीओ लाईटनिंग आयपीओनंतर बीएसई आणि एनएसई दोन्हीवर लिस्ट होईल.

कंपनी काय करते ?

आयकीओ लाइटनिंग (IKIO Lighting) कंपनी एलईडी लाइट्स बनवते. ही कंपनी नोएडामध्ये स्थित असून डिझाइन निर्मितीमध्ये (ODM) गुंतली आहे. ही कंपनी मॅन्युफॅक्टरर्स आणि ग्राहकांना प्रॉ़डक्ट सप्लाय करते. कंपनीचे 4 मॅन्युफॅक्टरिंग युनिट आहेत. यापैकी एक प्लांट उत्तराखंडमधील सिडकुल हरिद्वार इंडस्ट्रियल पार्कमध्ये आहे आणि बाकी 3 प्लांट एनसीआरमध्ये आहेत.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमित शाहांच्या पंतप्रधानपदाची तारीख सांगितली पण मालीवाल यांचा प्रश्न आल्यावर मात्र... केजरीवालांच्या मदतीला धावले अखिलेश

SRH vs GT : हैदराबादला प्ले-ऑफचे तिकीट की गुजरात शेवटच्या लढतीत घालणार विजयाला गवसणी... कोण पडणार कोणावर भारी?

Sharad Pawar: बारामतीच्या मतदानानंतर अजित पवार प्रचारातून गायब? शरद पवारांनी व्यक्त केली काळजी

Latest Marathi News Live Update : मुंबई- अहमदाबाद मार्गावर मोठी वाहतूक कोंडी

Swati Maliwal News : दिल्लीच्या राजकारणात भूकंप! कुठे आहेत स्वाती मालीवाल? मारहाणीच्या मुद्द्यावरुन भाजपने 'आप'ला घेरलं

SCROLL FOR NEXT