share market esakal
अर्थविश्व

Share Market: 14 हजारांचे झाले एक कोटी, तज्ज्ञ देताहेत गुंतवणुकीचा सल्ला

केवळ 14 हजार रुपये गुंतवून गुंतवणूकदार 21 वर्षात कोट्यधीश झाले.

सकाळ डिजिटल टीम

कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स उद्योगातील दिग्गज कंपनी हॅवेल्स इंडियाच्या (Havells India) शेअर्सने गुंतवणूकदारांना तगडा रिटर्न देत कोट्यधीश बनवले आहे. केवळ 14 हजार रुपये गुंतवून गुंतवणूकदार 21 वर्षात कोट्यधीश झाले.

ब्रोकरेज एडलवाईसने हॅवेल्सच्या शेअरना टारगेट वाढवत बाय रेटींग दिले आहे. एका महिन्यात हे शेअर्स ते सात टक्क्यांहून अधिक वाढू शकतात असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. एडलवाईसने 1,450 रुपयांचे टारगेट दिले आहे. मंगळवारी त्याचे शेअर्स सुमारे दोन टक्क्यांच्या वाढीसह 1349.40 रुपयांवर बंद झाले.

21 वर्षात 14 हजारांचे एक कोटी

हॅवेल्सचे शेअर्स 23 मार्च 2001 रोजी 1.89 रुपयांवर होते, जे केवळ 21 वर्षांत 714 पटीने वाढून 1349.40 रुपयांवर बंद झाले आहेत. म्हणजे एखाद्या गुंतवणूकदाराने त्या वेळी फक्त 14 हजार रुपये गुंतवले असते तर आज ते 1 कोटी रुपयांपर्यंत वाढले असते.

गेल्या वर्षी 18 ऑक्टोबर 2021 ला हा शेअर 1,503.70 रुपयांच्या एका वर्षाच्या उच्चांकावर होता पण त्यानंतर पुन्हा 7 मार्च 2022 ला हा शेअर 1,037.80  रुपयांच्या एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर घसरला. मात्र, त्यानंतर खरेदी सुरू झाली आणि आतापर्यंत ती 30 टक्क्यांनी वाढली आहे. यात तेजी दिसत राहणार असल्याचा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला, त्यामुळेच सध्याच्या किमतीत गुंतवणूक केल्यास केवळ एका महिन्यात 7 टक्क्यांहून अधिक नफा मिळू शकतो.

हॅवेल्स ही कंपनी लाइटिंग उपकरणे, एलईडी लाइटिंग, फॅन, मॉड्यूलर स्विचेस आणि वायरिंग असेसरीज, वॉटर हीटर्स, केबल्स आणि वायर्स, इंडक्शन मोटर्स आणि कॅपेसिटर्स तयार करते. त्याची उत्पादने हॅवेल्स, लॉयड, क्रॅबट्री, स्टँडर्ड इलेक्ट्रिक, रिओ आणि प्रॉमटेक नावाच्या ब्रँडद्वारे विकली जातात.

चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून 2022 च्या पहिल्या तिमाहीत हॅवेल्सने 242.43 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. मार्च तिमाहीत 352.95 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला. तिमाही आधारावर तिचा महसूल एप्रिल-जून 2022 मध्ये 4417.05 कोटी रुपयांवरून 4230.14 कोटी रुपयांवर घसरला.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

FDA Crime : ‘क्रीमी डिलाइट’, महावीर डेअरीवर एफडीएची कारवाई; लाखो रुपयांचे पदार्थ आढळले असुरक्षित

Teachers Agitation : सामूहिक रजा घेत शिक्षकांचे आंदोलन; पंचायत समितीवर मोर्चा, पाच तास धरणे आंदोलन, मुख्यालयाची अट शिथिल करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT