Bharat Forge
Bharat Forge Sakal
अर्थविश्व

भारत फोर्जच्या शेअरमध्ये मिळेल 51% पर्यंत परतावा...

शिल्पा गुजर

Best Stock to Buy: ऑटोमोबाईल ते डिफेन्स सेक्‍टरमध्ये काम करणाऱ्या भारत फोर्ज या कंपनीचे मार्च 2022 च्या तिमाहीचे निकाल चांगले आलेत. कंपनीने 16 मे रोजी निकाल जाहीर केला होता. कंपनीचा नेट प्रॉफिट आणि ऑपरेटिंग रेव्हेन्‍यू वाढला आहे. आज भारत फोर्जच्या स्टॉकमध्ये 2.5 टक्क्यांहून अधिक वाढ झाली. निकालानंतर ब्रोकरेज हाऊसमध्ये संमिश्र मत आहे. तर,रिसर्च फर्म स्टॉकबाबत आग्रही आहेत.

ब्रोकरेजचे मत ?

नोमुराने (Nomura) शेअरवर खरेदीचे मत कायम ठेवले आहे. तसेच, प्रति शेअर टारगेट 1006 रुपयांवरून 838 रुपये करण्यात आली आहे.

ग्लोबल ब्रोकरेज फर्म CLSA ने भारत फोर्जचा शेअर रेटिंग सेलवरून अंडरपरफॉर्ममध्ये अपग्रेड केला आहे. तसेच, टारगेट 713 रुपये प्रति शेअर करण्यात आले आहे. देशांतर्गत व्यवसायात सध्या सावध वातावरण आहे. EBITDA मार्जिन अपेक्षेपेक्षा कमी आहे. कंपनीला इलेक्ट्रिक व्हेइकल्स आणि डिफेन्समध्ये नवीन ऑर्डर मिळाल्या आहेत.

भारत फोर्जवर मॉर्गन स्टॅनलीचे रेटिंग 'ओव्हरवेट' आहे. टारगेट प्रति शेअर 1025 रुपये आहे. जेफरीजने स्टॉकचे रेटिंग 'बाय' वरून कमी केले आहे. टारगेटही 825 वरून 540 पर्यंत कमी केले आहे. CITI ने स्टॉकवर सेलचे रेटिंग कायम ठेवले आहे. टारगेट 670 रुपये केले आहे.

मोतीलाल ओसवाल यांनी भारत फोर्जवर खरेदीचे मत दिले आहे. टारगेट 865 रुपये केले आहे. त्याच वेळी, आयसीआयसीआय सिक्युरिटीजनेही स्टॉकवर खरेदीचे मत कायम ठेवले आहे. प्रति शेअर टारगेट 883 वरून 890 रुपयांपर्यंत वाढवली आहे.

51% परतावा मिळेल ?

भारत फोर्जच्या स्टॉकबाबत मॉर्गन स्टॅनली सर्वाधिक बुलिश आहे. ग्लोबल ब्रोकरेजने स्टॉकवर 1025 रुपयांचे टारगेट ठेवले आहे. शेअरची सध्याची किंमत सुमारे 677 रुपये आहे. अशाप्रकारे, सध्याच्या किंमतीपासून स्टॉकमध्ये सुमारे 51 टक्क्यांनी जोरदार उसळी घेऊ शकतो. गेल्या वर्षभरात हा शेअर 3 टक्क्यांहून अधिक वाढला आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने जिंकला टॉस; गुजरातच्या प्लेइंग-11 मध्ये मोठे बदल

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT