Share Market Todays Updates | Stock Market news
Share Market Todays Updates | Stock Market news Sakal
अर्थविश्व

Share Market: शेअर बाजारात पुन्हा घसरण; सेन्सेक्स 372 तर निफ्टी 127 अंकांच्या घसरणीसह सुरु

सकाळ डिजिटल टीम

Share Market: एक आठवडाभर झालेल्या सातत्यपूर्ण घसरणीनंतर काल शेअर बाजारात तेजी दिसून आली होती, मात्र आजच्या दिवसाची सुरुवात पुन्हा घसरणीने झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांनी आज गॅप डाऊन ओपनिंग दिलं. आजच्या दिवसाच्या सुरुवातीला सेन्सेक्स 372.93 अंकांनी घसरून 56,983.68 वर सुरु झाला तर निफ्टी 127.45 अंकांनी घसरून 17,073.35वर सुरु झाला. निफ्टी 50 मधील केवळ 6 शेअर्समध्ये आज वाढ झाल्याचे दिसून आली तर 44 शेअर्समध्ये घसरण नोंदवली गेली. (Share Market Latest News Updates)

तत्पूर्वी काल मंगळवारी 2 दिवसांनंतर शेअर बाजारात तेजी दिसून आली. सेन्सेक्स 776 अंकांनी वाढला, तर निफ्टी 17200 च्या पातळीवर बंद झाला, बीएसईचे सर्व सेक्टरल इंडेक्स तेजीत होते. दुसरीकडे, निफ्टी 246.85 अंकांच्या अर्थात 1.46 टक्क्यांच्या वाढीसह 17,200.80 वर बंद झाला.

मंगळवारी ऑटो, रियल्टी, एफएमसीजी सेक्टर्समध्ये खरेदी दिसून आली. फार्मा, पीएसई शेअर्समध्ये चांगली खरेदी झाली.

मंगळवारी शेअर बाजारात मंगलमय वातावरण दिसून आल्याचे मोतीलाल ओसवालच्या शिवांगी सरडा म्हणाल्या. निफ्टी मध्ये 17172 च्या पातळीवर खरेदी करायला हवी असे मत त्यांनी नोंदवले. यात 17250 ची पातळीही दिसू शकते, सोबतच 17000 वर स्टॉपलॉस लावण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

मोतीलाल ओसवालच्या शिवांगी सरडा यांनी बँक निफ्टी मध्येही खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यात 36585 वर खरेदी करू शकता असे त्या म्हणाल्या. पण 36250 वर स्टॉपलॉस लावण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPSC 2024 : AI ची कमाल! सात मिनिटांत सोडवला यूपीएससी प्रीलिम्सचा पेपर; किती मार्क मिळाले?

Rahul Gandhi Wayanad: राहुल गांधींचे ठरले! अखेर वायनाडचा 'हात' सोडला

Nashik Crime: रिक्षाचालकाचा पूर्ववैमनस्य अन्‌ आर्थिक वादातून दगडाने ठेचून खून; चौघांना पिंपरी चिंचवडमधून अटक

युएसएला मिळालं बक्षीस! मात्र सुपर 8 मधून बाहेर पडूनही पाकिस्तान 'या' कारणामुळं T20 World Cup 2026 साठी थेट पात्र

Samata Parishad : छगन भुजबळ वेगळी भूमिका घेणार? समता परिषदेच्या बैठकीत कार्यकर्त्यांची मागणी?

SCROLL FOR NEXT