Share Market esakal
अर्थविश्व

Share Market: बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म ?

आयटी, बँकिंग, रियल्टी, मेटल शेअर्स वधारले. एनर्जी, इन्फ्रा शेअर्समध्येही खरेदी झाली

सकाळ डिजिटल टीम

Share Market: शुक्रवारी दमदार जागतिक संकेतांमुळे बाजारात चांगली तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स 1181 अंकांनी वाढून 61795 वर बंद झाला, तर निफ्टी 322 अंकांनी वाढून 18350 वर बंद झाला. निफ्टी बँकही विक्रमी पातळीवर बंद झाली. निफ्टी बँक 533 अंकांनी वाढून 42,137 वर बंद झाला. त्याचवेळी मिडकॅप 23 अंकांनी वाढून 31382 वर बंद झाला. आयटी, बँकिंग, रियल्टी, मेटल शेअर्स वधारले. एनर्जी, इन्फ्रा शेअर्समध्येही खरेदी झाली.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

अमेरिकेत किरकोळ महागाई कमी झाल्याच्या बातम्यांमुळे जागतिक बाजारात तेजी दिसून आल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. आता जगभरातील सेंट्रल बँका व्याजदरांबाबत आपली भूमिका बदलतील अशी शक्यता वाढली आहे. मागच्या आठवड्यात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये सकारात्मक परतावा दिसला. दुसरीकडे, बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकात थोडीशी घसरण झाल्याचे ते म्हणाले. (Share Market)

जगभरातील गुंतवणूकदारांनी अमेरिकेत महागाई कमी होण्याच्या बातमीचे स्वागत केलं, त्यामुळे भारतीय बाजारात सकारात्मक वातावरण दिसल्याचे कोटक सिक्युरिटीजचे अमोल आठवले म्हणाले. आता यूएस फेड डिसेंबरच्या बैठकीत व्याजदरांबाबत नरम भूमिका ठेवेल आणि त्यामुळे महागाई कमी होईल असेही ते म्हणाले. निफ्टीने 18300 चा शॉर्ट टर्म रझिस्टंस तोडला आणि त्याच्या वर बंद झाला. बाजारासाठी हे चांगले संकेत आहेत. डेली आणि विकली चार्टवर बुलिश कँडल आणि रेंज ब्रेकआउट फॉर्मेशन येत्या काळात तेजी येण्याचे संकेत देत आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

एचडीएफसी (HDFC)

एचडीएफसी बँक (HDFCBANK)

इन्फोसिस (INFY)

टेक महिन्द्रा (TECHM)

एचसीएल टेक (HCLTECH)

झिंदाल स्टील (JINDALSTEL)

गोजरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड (SRTRANSFIN)

पर्सिस्टंट (PERSISTENT)

ऑरो फार्मा (AUROPHARMA)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parbhani News : अतिवृष्टीग्रस्त परभणी जिल्ह्यासाठी १२८ कोटींची आर्थिक मदत मंजूर; शेतकऱ्यांना थेट खात्यात जमा होणार नुकसानभरपाई

Pune Heavy Rain: पुण्यात मुसळधार पाऊस! रस्त्यांना नद्यांचं स्वरुप, वाहतूक ठप्प; पुणेकर खोळंबले

Latest Maharashtra News Updates : पुण्यात मुसळधार पाऊस; बाणेर-औंध रस्ता वाहतुकीसाठी अजूनही ठप्प

Parner Crime : सातबारा उताऱ्यावर नोंद लावण्यासाठी आठ हजारांची लाच घेताना कामगार तलाठ्याला रंगेहाथ पकडले

Pune Heavy Rain : पाषाण परिसरात मेघगर्जनेसह पावसाची हजेरी; चाकरमान्यांचे हाल, सखल भागात पाणी साचले

SCROLL FOR NEXT