Share Market: शेअर बाजार सोमवारी तेजीसह बंद झाला. मात्र आज शेअर बाजारात अस्थिरता दिसून येत आहे. सुरवातीच्या सत्रात शेअर बाजार वधारल्याचे दिसून आले. त्यानंतर शेअर बाजार निगेटिव्ह मध्ये गेला.
आज जवळपास 22 शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे तर 28 शेअर्समध्ये घसरण आहे. आज दिवसभर शेअर्समध्ये चढ उतार दिसून येईल. त्यामुळे शेवटपर्यंत गुंतवणूकदारांमध्ये धाकधूक कायम राहणार. (share market opening update 2 august 2022 )
सोमवारी बाजारात तेजी होती. चागंले जागतिक संकेत, जून तिमाहीचे चांगले निकाल आणि मजबूत वाहन विक्री आकड्यांमुळे बाजारातील सकारात्मक वातावरण होते. याशिवाय जुलै महिन्यातील मजबूत जीएसटी कलेक्शन आणि पीएमआयच्या आकडेवारीत झालेली वाढ यामुळेही बाजाराला सपोर्ट मिळाला.
सोमवारी व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 545.25 अंकांच्या म्हणजेच 0.95 टक्क्यांच्या वाढीसह 58,115.50 वर बंद झाला होता. दुसरीकडे, निफ्टी 181.80 अंकांच्या म्हणजेच 1.06 टक्क्यांच्या वाढीसह 17,340.05 वर बंद झाला होता.
बाजाराच्या नजरा आता आरबीआयच्या धोरणावर असतील. FII च्या गुंतवणुकीमुळे गुंतवणूकदार खूश आहेत. निफ्टी 200 दिवसांच्या SMA वर आहेआणि इंट्राडेमध्ये हायर हाय आणि हायर लो फॉर्मेशन कायम आहे. आता बाजार ओव्हरबॉट झोनमध्ये दिसत आहे. त्यामुळे येत्या काळात इंट्राडेमध्ये करेक्शन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?
एसबीआय लाईफ (SBILIFE)
टाटा स्टील (TATASTEEL)
हिन्दाल्को (HINDALCO)
सनफार्मा (SUNPHARMA)
कोल इंडिया (COALINDIA)
आयआरसीटीसी (IRCTC)
टीव्हीएस मोटर्स (TVSMOTORS)
गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)
भारतीय कंटेनर निगम लिमिटेड (CONCOR)
एमफॅसिस (MPHASIS)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.