Share Market Latest Updates | Stock Market News
Share Market Latest Updates | Stock Market News  sakal
अर्थविश्व

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात विक्रीचा जोर, Sensex अन् Nifty घसरली

सकाळ डिजिटल टीम

आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात घसरण दिसून आली. प्री-ओपनिंगमध्येच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण दिसत आहे. शेअर मार्केटमध्ये सेन्सेक्स १५८ अंकांनी घसरुन ५५,६१० वर उघडला आणि निफ्टी ५३.६० अंकांनी घसरुन १६,५३० वर उघडला त्यामुळे आज शेअर बाजारात विक्रीचा जोर पाहायला मिळेल.

शुक्रवारी दमदार सुरुवातीनंतर शेअर बाजारात घसरण झाली होती. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक दिवसअखेर लाल चिन्हात बंद झाला होता. सेन्सेक्स 48.88 अंकांनी अर्थात 0.09 टक्क्यांनी घसरून 55769.23वर बंद झाला, तर निफ्टी 43.70 अंकांनी अर्थात 0.26 टक्क्यांनी घसरून 16628 वर बंद झाला होता.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?
3 जून रोजी अर्थात शुक्रवारी सेन्सेक्स 56119 च्या पातळीवर बंद झाला. या आठवड्यात सेन्सेक्स 2.24 टक्क्यांनी वाढला आहे. तर शुक्रवारी निफ्टी 16,931 च्या पातळीवर बंद झाला आहे आणि या आठवड्यात तो 1.95 टक्क्यांनी वाढला आहे.

महागाई वाढण्याची आणि व्याजदरात वाढ होण्याची भीती याचा बाजारावर दबाव असल्याचे झाल्याचे कोटक सिक्युरिटीचे श्रीकांत चौहान म्हणाले. या आठवड्यात सर्व देशांच्या मध्यवर्ती बँकांनी त्यांचे व्याजदर वाढवलेत, ज्याचा परिणाम बाजारावर होत असल्याचेही ते म्हणाले.

बाजारात सध्या वाढती महागाई, व्याजदरातील वाढीमुळे बाजारात चिंतेचे वातावरण असल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा म्हणाले. अशा परिस्थितीत बाजारातील कोणत्याही तेजीवर नफा बुकिंग (Profit Booking) करण्याचा सल्ला त्यांनी दिला.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

रिलायन्स (RELIANCE)
इन्फोसिस (INFY)
एल अँड टी (LT)
सनफार्मा (SUNPHARMA)
एचसीएल टेक (HCLTECH)
ट्रेंट (TRENT)
एमआरएफ (MRF)
हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)
पर्सिस्टंट (PERSISTENT)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan: सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरण! एका आरोपीचा पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती गंभीर

Monsoon Season : यंदा 'मॉन्सून' लवकरच हजेरी लावणार; हवामानतज्ज्ञांचा अंदाज, उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने

Changpeng Zhao: बिनन्सच्या संस्थापकाला तुरुंगवास; जगातील सर्वात श्रीमंत क्रिप्टो एक्सचेंजमध्ये नेमकं काय झालं?

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

Latest Marathi News Live Update: मनेका गांधींनी भरला उमेदवारी अर्ज

SCROLL FOR NEXT