Share-Market sakal media
अर्थविश्व

Share Market : प्राज इंडस्ट्रीजचे शेअर्स विक्रमी उच्चांकावर, आणखी तेजी येईल का ?

शेअरच्या व्हॉल्यूममध्येही मोठी वाढ झाली आहे. जानेवारी 2022 ला 448.25 रुपयांचाआधीचा उच्चांक होता.

सकाळ डिजिटल टीम

Praj Industries : प्राज इंडस्ट्रीजचे शेअर्स गुरुवारी 453.65 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचले. शिवाय इंट्राडे ट्रेडिंगमध्ये 9 टक्क्यांची तेजी दिसली. शेअरच्या व्हॉल्यूममध्येही मोठी वाढ झाली आहे. जानेवारी 2022 ला 448.25 रुपयांचाआधीचा उच्चांक होता.

येत्या तिमाहीत कंपनीला मोठ्या प्रमाणात ऑर्डर मिळण्याची शक्यता असल्याने स्टॉकमध्ये तेजी दिसून येत आहे. शेअरचा दिवसाचा उच्चांक 453.70 रुपये आहे तर दिवसाचा नीचांक 416 रुपये आहे. सध्या स्टॉकचे प्रमाण 6,850,198 शेअर्स आहे.

प्राज इंडस्ट्रीज प्रोसेस आणि प्रोजेक्ट इंजीनिअरिंगच्या व्यवसायात आहे. कंपनी देशांतर्गत आणि परदेशी अशा दोन्ही ठिकाणी व्यवसाय करते. शिवाय डिझायनिंग आणि इंजीनिअरिंग सेवाही देते. कंपनी आपल्या इथेनॉल व्यवसायाबद्दल अतिशय सकारात्मक आहे.

पेट्रोल आणि डिझेलमध्ये इथेनॉल मिश्रण स्कीममुळे कंपनीला आणखी फायदा होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. इथेनॉलच्या वाढत्या मागणीचा फायदा कंपनीला मिळेल, असे त्यांचे म्हणणे आहे. कंपनी आपल्या दुसऱ्या प्लांटमधील इथेनॉल उत्पादन प्रकल्पाबद्दल खूप आशावादी आहे.

2025 पर्यंत 20 टक्के इथेनॉल ब्लेडिंगचे टारगेट साध्य करण्यावर सरकारने लक्ष केंद्रित केल्यामुळे प्राज इंडस्ट्रीजला फायदा होईल, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भावाशी बोललो! इस्रायल इराण युद्धानंतर पीएम मोदींचा आखाती देशांच्या प्रमुखांना कॉल, काय म्हणाले?

Latest Marathi News Live Update: खार स्टेशनजवळ दोन इसम चालत्या ट्रेनमधून पडले

Leopard Caught : नागापूर येथे एका महिन्यात चार बिबटे जेरबंद

Iran War: इराण-इस्रायलच्या लढाईत भारताला फटका! चार दिवसांत मोठं आर्थिक नुकसान, धक्कादायक आकडेवारी समोर

IND vs ENG: चंद्रग्रहणात सराव... नको रे बाबा! भारतीय संघाने वानखेडेवरील सरावाची वेळ बदलली, सूर्याच्या संघाने 'ती' वेळ टाळली

SCROLL FOR NEXT