Stocks to Buy Today | Trading Tips Sakal
अर्थविश्व

शेअर बाजाराचा मूड कसा असेल ? आज कोणत्या 10 शेअर्सवर कराल फोकस?

शुक्रवारी ग्रासिम इंडस्ट्रीज, आयटीसी, एसबीआय लाइफ इन्शुरन्स, जेएसडब्ल्यू स्टील आणि एम अँड एम हे निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले होते.

शिल्पा गुजर

Share Market Pre Open Analysis: 2022-23 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या मॉनिटरी पॉलिसी रिव्ह्यूमध्ये रिझर्व्ह बँकेने व्याजदर स्थिर ठेवल्याने शेअर बाजार वाढीसह बंद झाला. त्यामुळे बाजारातील सलग तीन दिवसांच्या घसरणीला ब्रेक लागला. दिवसाच्या शेवटी सेन्सेक्स 412.23 अंकांनी अर्थात 0.70 टक्क्यांनी वाढून 59,447.18 वर आणि निफ्टी 144.80 अंकांनी अर्थात 0.82 टक्क्यांनी वाढून 17,784.30 वर बंद झाला.

आरबीआयच्या बैठकीच्या अगोदर गेल्या दोन-तीन दिवसांआधी बाजाराने सावध भूमिका घेतली होती असे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले. पण आता लक्ष चौथ्या तिमाहीच्या कमाईच्या सिझनकडे आल्याचेही ते म्हणाले. हा कमाईचा सिझन पुढील आठवड्यात सुरू होईल. याची सुरुवात आयटी आणि बँकिंग क्षेत्राकडून केली जाईल.

शुक्रवारी ग्रासिम इंडस्ट्रीज, आयटीसी, एसबीआय लाइफ इन्शुरन्स, जेएसडब्ल्यू स्टील आणि एम अँड एम हे निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले होते. तर दुसरीकडे, सिप्ला, एनटीपीसी, टेक महिंद्रा, मारुती सुझुकी आणि सन फार्मा या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली.

सेक्टरल इंडेक्सबाबत बोलायचे झाल्यास, निफ्टी एफएमसीजी आणि मेटल 2-2 टक्क्यांनी वधारले. ऑटो आणि बँक इंडेक्समध्ये 0.5 टक्क्यांची वाढ दिसून आली.

सोमवारी कसा असेल शेअर बाजाराचा मूड?

बाजाराने 10-दिवसांच्या साध्या मूव्हिंग अॅव्हरेज (SMS) जवळ सपोर्ट घेतला आणि रिव्हर्सल फॉर्मेशन तयार केल्याचे कोटक सिक्युरिटीजचे अमोल आठवले म्हणाले. हे नजीकच्या काळात पुलबॅक रॅली सुरू ठेवण्याचे संकेत देते. येत्या काळात रेंजबाउंड टेक्स्चर चालू राहू शकेल. 17,550 हा बुल्ससाठी महत्त्वाचा सपोर्ट झोन असेल. याच्या वर निर्देशांक 17,900-18,000 पर्यंत जाऊ शकतो. दुसरीकडे, जर निर्देशांक 10-दिवसांच्या SMA किंवा 17,550 च्या खाली बंद झाला, तर तो आणखी घसरण्याची आणि 17,400-17,300 च्या दिशेने सरकण्याची शक्यता असल्याचेही ते म्हणाले.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते? (Top 10 Shares to buy Today)-

ग्रासिम (GRASIM)

आयटीसी (ITC)

एसबीआय लाईफ (SBILIFE)

जेएसडब्ल्यू स्टील ( JSWSTEEL)

अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)

हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDUPETRO)

श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड (SRTRANSFIN)

भारतीय कंटेनर निगम लिमिटेड (CONCOR)

टीव्हीएस मोटर्स (TVSMOTORS)

अशोक लेलँड (ASHOKLEY)

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT