Share Market Update sakal
अर्थविश्व

शेअर बाजार सुरू होण्यापूर्वी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील कमाल ?

आज शॉर्ट टर्ममध्ये बाजारात कमजोरी कायम राहील, पण जर निफ्टी 16,824 चा स्विंग मोडते तर ही पातळी 16,600 च्या वर जाऊ शकते

शिल्पा गुजर

बीजिंगमध्ये लॉकडाऊन लागण्याच्या भीतीचा परिणाम सोमवारी भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. त्यामुळे बाजार सलग दुसऱ्या दिवशी घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स 617.26 अंकांनी म्हणजेच 1.08 टक्क्यांनी घसरून 56,579.89 वर बंद झाला. तर निफ्टी 218.00 अंकांनी अर्थात 1.27 टक्क्यांनी घसरून 16,953.95 वर बंद झाला.

वाढती महागाई, कच्चा तेलाच्या वाढत्या किंमती, शिवाय रशिया युक्रेन युध्दाच्या बिघडत्या परिस्थितीमुळे संपूर्ण जगाच्या बाजारावर नकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचे असे जियोजित फायनान्शियल सर्व्हिसेजचे विनोद नायर म्हणाले. बीजिंगमध्ये वाढती कोरोना प्रकरणं चिंतेत टाकणारी असल्याचे ते म्हणाले.

आज कशी असेल शेअर बाजारातली स्थिती ?

निफ्टीने डेली चार्टवर मागचा गॅप भरून काढण्याचा प्रयत्न केला मात्र, या गॅपच्या वर विक्रीचा सामना करावा लागल्याचे शेरखानच्या गौरव रत्नपारखी यांचे म्हणणे आहे. तेव्हापासून बाजारात घसरण दिसून येत आहे. बाजारातील एकूण स्ट्रक्चरवर नजर टाकली तर शॉर्ट टर्ममध्ये बाजारात कमजोरी कायम राहील, पण जर निफ्टी 16,824 चा स्विंग मोडते तर ही पातळी 16,600 च्या वर जाऊ शकते असेही ते म्हणाले.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

बजाज ऑटो (BAJAJAUTO)

एचडीएफसी बँक (HDFCBANK)

आयसीआयसीआय बँक (ICICIBANK)

ॲक्सिस बँक (AXISBANK)

एचडीएफसी (HDFC)

बाळकृष्ण इंडस्ट्रीज (BALKRISIND)

ऑरो फार्मा (AUROPHARMA)

गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

झी एन्टरटेन्मेंट लिमिटेड (ZEEL)

आरती इंडस्ट्रीज (AARTIIND)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT