Share Market Latest Updates | Stock Market News
Share Market Latest Updates | Stock Market News Sakal
अर्थविश्व

शेअर बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आजचे परफॉर्म करु शकणारे 10 शेअर्स कोणते ?

शिल्पा गुजर

Share Market Analysis: मंगळवारचा दिवस शेअर बाजारासाठी शुभ ठरला. सेन्सेक्स-निफ्टी सुमारे 2.5% च्या वाढीसह बंद झाले. सेन्सेक्स 1,345 अंकांनी आणि निफ्टी 417 अंकांनी वाढून बंद झाले. मिडकॅप, स्मॉलकॅप शेअर्सची खरेदी दिसून आली. मेटल स्टॉकमध्ये तीन महिन्यांतील सर्वात मोठी वाढ झाली आहे. मेटल इंडेक्समध्ये 30 एप्रिल 2020 नंतर मोठी इंट्रा-डे रॅली दिसली. तेल-गॅस, ग्राहकोपयोगी वस्तू, वाहन शेअर्समध्ये चांगली खरेदी दिसून आली. त्याचबरोबर बँकिंग, एफएमसीजी, रियल्टी शेअर्समध्येही जोरदार उसळी पाहायला मिळाली.

मंगळवारच्या व्यवहारात, निफ्टीच्या 50 पैकी 49 शेअर्समध्ये वाढ झाली, तर सेन्सेक्समधील सर्व 30 शेअर्समध्ये वाढ दिसली. तर निफ्टी बँकेच्या सर्व 12 शेअर्समध्ये वाढ दिसून आली. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 1344.63 अंकांच्या म्हणजेच 2.54 टक्क्यांच्या वाढीसह 54,318.47 वर बंद झाला. निफ्टी 417.00 अंकांच्या म्हणजेच 2.63 टक्क्यांच्या वाढीसह 16,259.30 वर बंद झाला.

एलआयसीचा शेअर बीएसईवर मंगळवारी पहिल्या दिवशी 8.04 टक्क्यांनी घसरून 872.70 रुपयांवर बंद झाला. LIC चा IPO त्‍याच्‍या इश्यू प्राईसच्‍या तुलनेत 9 टक्‍क्‍यांच्या सवलतीवर लिस्ट झाला होता.

बर्‍याच काळानंतर भारतीय बाजारपेठेत हेवी वेट्स आणि बॉर्डर मार्केटच्या सपोर्टमुळे चांगली वाढ झाल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले. बाजार ओव्हरसोल्ड क्षेत्रापर्यंत पोहोचला. दरम्यान, चीनच्या तंत्रज्ञान स्टॉकमध्ये वाढ झाल्याने आशियाई बाजारांतून मजबूतीचे संकेत दिसू लागलेत.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

नुकत्याच झालेल्या घसरणीत बाजारात जास्त विक्री झाल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. त्यामुळे मंगळवारी तेजी दिसली. निफ्टीने आज चार्टवर एक लॉन्ग बुलिश कँडल तयार केली आहे जी शॉर्ट टर्मसाठी सकारात्मक आहे. ट्रेंड फॉलो करणाऱ्या ट्रेडर्ससाठी 16,150 ही महत्त्वाची पातळी असेल. जर निफ्टी त्याच्या वर राहिला तर 16,380-16,450 ची पातळी शक्य आहे. दुसरीकडे, जर निफ्टी 16150 च्या खाली घसरला तर 16,080-16,050 ची पातळी पाहायला मिळेल.

निफ्टी गेल्या काही ट्रेडिंग सत्रांपासून बाजूला दिसत होता असे शेअरखानचे गौरव रत्नपारखी म्हणाले. 16 मे रोजी डेली चार्टवर एक डोजी पॅटर्न तयार केला. जे बाजारातील अनिश्चिततेचे लक्षण होते. प्राइस पॅटर्न पाहता निफ्टीने आवर्ली चार्ट पर एक ट्रायंग्युलर पॅटर्न तयार केला आहे. 17 मे रोजी, निफ्टी या अनिश्चित स्थितीतून वरच्या बाजूला जाताना दिसला. आणि या क्रमाने, 16000 ची पातळी ओलांडण्याबरोबरच, निफ्टी महत्त्वपूर्ण आवर्ली मूव्हिंग एव्हरेज ओलांडताना दिसला, ज्यामुळे बुल्स मजबूत झाले. हे सर्व ट्रेंड निफ्टीचा शॉर्ट टर्म कल सकारात्मक असल्याचे दाखवतात.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

हिन्दाल्को (HINDALCO)

टाटा स्टील (TATASTEEL)

कोल इंडिया (COALINDIA)

जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)

ओएनजीसी (ONGC)

एल अँड टी (LTTS)

टाटा पॉवर (TATAPOWER)

डिक्सन (DIXON)

आयआरसीटीसी (IRCTC)

एमफॅसिस (MPHASIS)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT