Bank of Baroda esakal
अर्थविश्व

100 रुपयांपेक्षा कमी किमतीचा 'हा' बँक शेअर देईल तगडी कमाई

गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना 30 टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला आहे.

शिल्पा गुजर

गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना 30 टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला आहे.

BUY call on PSU bank Stock BoB: तुम्ही शेअर बाजारात (Share Market) तुमच्या पोर्टफोलिओसाठी (Portfolio) दर्जेदार स्टॉक शोधत असाल, तर PSU बँकिंग स्टॉक बँक ऑफ बडोदा (PSU bank Stock BoB) हा एक चांगला पर्याय असू शकतो. बँक व्यवस्थापनाला रिटेल सेगमेंटमध्ये तिसऱ्या तिमाहीत (Q3) वाढीचा वेग कायम ठेवण्याची आशा आहे. बँकेचा अर्निंग्स आउटलुक आणि एसेट क्वालिटी पाहता, ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने बँक ऑफ बडोदा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. 100 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या या बॅक शेअरमध्ये गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना 30 टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला आहे.

बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक आहे. मोतीलाल ओसवाल यांच्या अहवालानुसार, दुसऱ्या तिमाहीत (Q2) बँकेची कमाई मजबूत आहे. कॉर्पोरेट आणि रिटेल बुकमुळे बँकेचा व्यावसायिक ट्रेंड सुधारला आहे. रिटेल सेगमेंटच्या आधारावर तिसऱ्या तिमाहीत (Q3) वाढीचा वेग कायम राहील अशी बँक व्यवस्थापनाला आशा आहे. मात्र, बँकेच्या कॉर्पोरेट बुकमध्ये हळूहळू रिकव्हरी होताना दिसत आहे. तिसऱ्या तिमाहीत एसेट क्वालिटी स्थिर राहू शकते.

मोतीलाल ओसवाल यांनी त्यांच्या फंडामेंटल अपडेटमध्ये बँक ऑफ बडोदावर 'बाय' रेटिंगसह 130 रुपयांचे टारगेट दिले आहे. 11 जानेवारी 2022 रोजी शेअरची किंमत 92.20 रुपयांवर होती. म्हणजेच, गुंतवणूकदारांना प्रति शेअर 38 रुपये किंवा सध्याच्या किमतीच्या सुमारे 41 टक्के परतावा मिळू शकतो. गेल्या एक वर्षाचा परतावा चार्ट पाहिल्यास, बँक ऑफ बडोदा जवळपास 30 टक्के वाढला आहे. त्याच वेळी, गेल्या सहा महिन्यांत स्टॉक 10 टक्क्यांहून अधिक वाढला आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Dates: देशातील पाच राज्यांमध्ये निवडणुकीचा बिगुल वाजला! निवडणूक आयोगाकडून तारखा जाहीर; पाहा संपूर्ण कार्यक्रम...

Navi Mumbai: नवी मुंबईची कोंडी सुटणार, खारघर-तुर्भे लिंक रोड कधी खुला होणार? मुख्यमंत्र्यांनी तारीखच सांगितली

37 वर्षं गायब आहे बॉलिवूडमध्ये नावाजलेली मराठी अभिनेत्री; ऋषी कपूर यांच्यावर केलेले आरोप !

Latest Marathi Live Update : Jalna: धनगर आंदोलक दीपक बोऱ्हाडे मुंबईकडे रवाना, उद्यापासून आझाद मैदानावर उपोषण करणार

IND vs PAK: 'भारताच्या DNA मध्ये ट्रॉफी अन् आमच्यामध्ये फक्त पराभव...' माजी कर्णधाराने काढले पाकिस्तान क्रिकेटचे वाभाडे

SCROLL FOR NEXT