Share Market 
अर्थविश्व

शेअर बाजाराची सकारात्मक वाटचाल

पीटीआय

शेअर बाजाराची सकारात्मक वाटचाल सुरू आहे. आजदेखील राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी आणि मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स या दोन्ही निर्देशांकात वाढ नोंदवण्यात आली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ७० अंशांची तर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये १५५ अंशांची वाढ सकाळच्या सत्रात दिसून आली. सेन्सेक्स ३४,१३५ अंशांच्या पातळीवर व्यवहार करतो आहे. तर निफ्टी १०,०९९ अंशांच्या पातळीच्या वर व्यवहार करतो आहे.

अबु धाबीस्थित मुबादला इन्व्हेस्टमेंट कंपनीद्वारे रिलायन्स जिओमध्ये झालेल्या ९,०९३ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा करण्यात आल्यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर उच्चांकीवर व्यवहार करतो आहे. रिलायन्सचा शेअर २ टक्क्यांनी वधारून  १,६१४.९५ रुपये प्रति शेअरच्या पातळीवर व्यवहार करतो आहे.
तर टाटा मोटर्स, टाटा स्टील, भारती एअरटेल, युपीएल, हिंडाल्को या कंपन्यांच्या शेअरच्या किंमतीत मोठी तेजी नोंदवण्यात आली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

निफ्टी बॅंक, निफ्टी आयटीसह इतरही निर्देशांक सकारात्मकरित्या वाढ नोंदवत आहेत. 

कच्च्या तेलाच्या किंमतींमध्येही तेजी नोंदवण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीतसुद्धा वाढ झाली आहे. एमसीएक्सवर कच्चे तेल २८३७ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करते आहे.

तर डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यात मात्र थोडी सुधारणा झाली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया ०.१५५ रुपयांनी वधारला आहे. आंतरराष्ट्रीय चलन बाजारात  डॉलरच्या तुलनेत रुपया ७५.४२ रुपये प्रति डॉलरवर व्यवहार करतो आहे.

* सेन्सेक्स ३४,१३५ अंशांच्या पातळीवर
* निफ्टी १०,०९९ अंशांच्या पातळीवर 
* निफ्टीमध्ये ७० अंशांची वाढ
* सेन्सेक्समध्ये १५५ अंशांची वाढ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Snake Discovery: डोळे नसलेल्या सापावर संशोधन; पुण्यातील ‘तस्कर’ सापाची आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये नोंद, डोळ्यांच्या जागी गुळगुळीत खवले!

Pune News: प्रवाशांच्या खिशाला बसणार कात्री! तिकिटावरील मर्यादा रद्द; विमान कंपन्यांनी दर वाढवले, काय आहेत कारणे?

Chhatrapati Sambhajinagar: चार किमी आले, उरले ३५ किलोमीटर!; दुसरा टप्पा सुरू; नक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत कधी येणार?

Chhatrapati Sambhajinagar: थकबाकीमुळे ८१ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

Chhatrapati Sambhajinagar: आठवडाभरात मिळणार शिधापत्रिकेवर केरोसीन; कंपन्यांकडून तालुकानिहाय होणार वाटप

SCROLL FOR NEXT