share market.jpg
share market.jpg 
अर्थविश्व

सेन्सेक्समध्ये 500 हून अधिक अंकांची उसळी; निफ्टी 15,100 वर

इ सकाळ ऑनलाइन

मुंबई- सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये गुरुवारी सकाळी उत्साह दिसून आला. सकाळी बाजार सुरु होताच सेन्सेक्समध्ये 500 हून अधिक अंकाची उसळी दिसून आली. बीएसई 51300 आणि निफ्टी 15100 च्या वर ट्रेड करत आहे. जागतिक बाजारातही मजबुतीचे संकेत दिसत आहेत. बँकिंग, आयटी आणि आर्थिक क्षेत्रात विक्री दिसून येत आहे. सेन्सेक्स 10.07 मिनिटाला 435.24 अंक म्हणजेच 0.86 टक्क्यांनी वाढून 51,216.93 वर ट्रेड करत होता. तर यादरम्यान निफ्टी 144.30 अंक म्हणजेच 0.96 टक्क्यांनी उसळी घेऊन 15126.30 वर ट्रेड करत होते. त्यापूर्वी सेन्सेक्समध्ये 500 हून अधिक अंकांनी वाढ झाली होती. 

सेन्सेक्स 9.22 वाजता 557 अंकांनी वाढून 51339 वर पोहोचला होता. तर निफ्टी 159 अंकांनी वाढून 15140 च्या पातळीला गेले होते. दरम्यान, बुधवारी नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये तांत्रिक बिघाडामुळे दोन्ही एक्सचेंजने पाच वाजेपर्यंत वेळ वाढवली होती. त्यानंतर एनएसईमध्ये 3.45 वाजता दुसऱ्यांदा व्यवहार सुरु झाला होता. अखेरीस निफ्टी 274.02 अंक म्हणजेच 1.86 टक्क्यांनी वाढीसह 14982 अंकावर बंद झाले. अशाच पद्धतीने बीएसई सेन्सेक्स 1030.28 अंक किंवा 2.07 टक्क्यांनी वाढीसह 50781.69 अंकावर पोहोचला.

बुधवारी जोरदार तेजीसह गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 2.60 लाख कोटी रुपयांची वाढ झाली. बुधवारी भारतीय शेअर बाजारच्या बेंचमार्क शेअर्समध्ये थोडीसी तेजी दिसून आली होती. यामध्ये एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रिज, बजाज फायनान्स, ऍक्सिस बँक, लार्सन अँड ट्रूबो, आयसीआयसीआय बँक तसेच स्टेट बँक ऑफ इंडियाचा प्रामुख्याने समावेश होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates: भाजपविरोधातील पोस्ट तातडीनं हटवा; निवडणूक आयोगाचे 'X' ला आदेश

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : काँग्रेसच्या काळात मराठवाड्याचा विकास रखडला होता - पीएम मोदी

SCROLL FOR NEXT