Share Market Investment Tips in Marathi  Sakal
अर्थविश्व

Share Market : गुंतवणूकदारांना मोठा इशारा! देशातील 10 सर्वात मोठ्या कंपन्यांची अवस्था बिकट, गुंतवणूक...

गेल्या आठवड्यात बीएसईचा 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 159.18 अंकांनी म्हणजेच 0.26 टक्क्यांनी घसरला.

सकाळ डिजिटल टीम

Indias Top 10 Most Powerful Companies : देशातील दहा सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी सहा कंपन्यांचे एकत्रित मूल्यांकन गेल्या आठवड्यात 49,231.44 कोटी रुपयांनी घसरले, त्यात हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL) कंपनीला सर्वात जास्त तोटा झाला.

गेल्या आठवड्यात बीएसईचा 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 159.18 अंकांनी म्हणजेच 0.26 टक्क्यांनी घसरला.

एचयूएल (HUL) व्यतिरिक्त, भारती एअरटेल, आयटीसी, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी या दहा कंपन्यांना मोठे नुकसान झाले आहे. दुसरीकडे, टीसीएस, एसबीआय, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि इन्फोसिसचे बाजार भांडवल वाढले आहे.

या कंपन्यांचे मोठे नुकसान :

चार कंपन्यांचे बाजार मूल्य एकत्रितपणे 35,840.35 कोटी रुपयांनी वाढले, परंतु इतर 6 कंपन्यांच्या एकूण तोट्यापेक्षा ते कमी होते. हिंदुस्थान युनिलिव्हरचे बाजारमूल्य 15,918.48 कोटी रुपयांनी घसरून 6,05,759.87 कोटी रुपयांवर आले.

भारती एअरटेलचे मूल्यांकन 12,540.63 कोटी रुपयांनी घसरून 4,29,474.82 कोटी रुपये आणि ITCचे मूल्यांकन 11,420.89 कोटी रुपयांनी घसरून 4,60,932.38 कोटी रुपये झाले. ICICI बँक 6,863.37 कोटी रुपयांनी घसरून 5,95,885.63 कोटींवर बंद झाली.

एचडीएफसी बँकेचे भांडवल 1,255 कोटी रुपयांनी घसरून 9,23,933.45 कोटी रुपये झाले आणि एचडीएफसीचे भांडवल 1,233.07 कोटी रुपयांनी घसरून 4,91,080 कोटी रुपये झाले.

'या' कंपन्यांमध्ये नफा :

नफा कमावणाऱ्या कंपन्यांमध्ये टीसीएसचे मूल्यांकन 19,612.52 कोटी रुपयांनी वाढून 12,93,639.32 कोटी रुपयांवर पोहोचले. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे बाजार भांडवल 7,585.92 कोटी रुपयांनी वाढून 4,93,486.41 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

देशातील सर्वात मौल्यवान कंपनी म्हणून रिलायन्सने आपले स्थान कायम ठेवले. त्याचे मूल्यांकन 4,938.8 कोटी रुपयांनी वाढून 15,80,653.94 कोटी रुपये झाले. इन्फोसिसची एकूण संपत्ती 3,703.11 कोटी रुपयांनी वाढून 6,76,638.36 कोटी रुपयांवर पोहोचली.

सर्वात मौल्यवान भारतीय कंपन्यांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीज पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर टीसीएस, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, हिंदुस्थान युनिलिव्हर, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, एचडीएफसी, आयटीसी आणि भारती एअरटेल यांचा क्रमांक लागतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT