Share Market  google
अर्थविश्व

Share Market : या मिडकॅप स्टॉकमध्ये 190% रिटर्न देण्याची क्षमता, 30 महिन्यांसाठीचे टारगेट जाणून घेऊयात...

ब्रोकरेज फर्म व्हेंचुरा सिक्युरिटीज लिमिटेडने यात 729.20 रुपयांचे टारगेट देत 30 महिन्यांचे टारगेट दिले आहे. हे टारगेट सध्याच्या 249.90 रुपयांपेक्षा 191 टक्के अधिक आहे.

नमिता धुरी

मुंबई : आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्सच्या (IRB Infrastructure) शेअर्सने गुंतवणुकदारांना लाँग टर्ममध्ये चांगला परतावा दिला आहे. पण सध्या हे शेअर्स एका रेंजमध्ये व्यापार करताना दिसत आहे. पण येत्या काळात हे शेअर्स 190 टक्के परतावा देतील असा विश्वास शेअर बाजार तज्ज्ञ देत आहेत. हेही वाचा - दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर ही 15,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त मार्केट कॅप असलेली मिडकॅप कंपनी आहे. आयआरबी इन्फ्रा ही भारतातील महामार्ग क्षेत्रातील पहिल्या आणि सुरुवातीच्या मल्टीनॅशनल इंफ्रास्ट्रक्चर डेवलपर्सपैकी एक आहे.

ब्रोकरेज फर्म व्हेंचुरा सिक्युरिटीज लिमिटेडने यात 729.20 रुपयांचे टारगेट देत 30 महिन्यांचे टारगेट दिले आहे. हे टारगेट सध्याच्या 249.90 रुपयांपेक्षा 191 टक्के अधिक आहे.

कंपनीने एनएचएआयकडून (NHAI) महत्त्वपूर्ण ऑर्डर मिळवल्या आहेत, ज्यात युपीमधील सर्वात मोठा बांधकामाधीन एक्सप्रेसवे गंगा एक्सप्रेसवेसाठीची ऑर्डरही समाविष्ट आहे. यामुळे यात मजबूत वाढ होईल, शिवाय सध्या हा स्टॉक अत्यंत स्वस्तात उपलब्ध असल्याचा व्हेंचुराचे म्हणणे आहे.

आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्सची कामगिरी आतापर्यंत कमकुवत राहिली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे व्यवस्थापनाचे धोरण, जे बीओटी प्रकल्पांवर केंद्रित असल्याचे व्हेंचुराचे म्हणणे आहे. मॅनेजमेंटने खासगी इनविट्ससह भागीदारी करून, 24.9% हिस्सा सिंट्राला, 16.9% हिस्सा जीआयसीला आणि पब्लिक इनविट्सला प्रिफरंशियल अलॉटमेंट करत आपली बॅनेन्सशीट मजबूत केली आहे.

यामुळे गुंतवणूकदारांची भीती बर्‍याच अंशी दूर झाली आहे. शिवाय आयआरबी इन्फ्रा स्टॉकने एका महिन्यात सुमारे 7 टक्के, सहा महिन्यांत 11 टक्के, वर्षभरात सुमारे 25 टक्के परतावा दिला आहे.

मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSRP Deadline Rule: आता दंड की सवलत? अंतिम मुदतीनंतरही HSRP नंबर प्लेट बदलली नसेल तर काय होणार? जाणून घ्या नियम...

Ikkis Movie Review: भारतमातेच्या वीरपुत्राची शौर्यगाथा; कसा आहे धर्मेंद्र' यांचा शेवटचा चित्रपट 'इक्कीस'

Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यात विकासाची पवनचक्की फिरतेय; पण शेतकरी व बेरोजगारांचे प्रश्न अनुत्तरितच!

Oppo Reno 15 Series Launch Date : तब्बल 200 मेगापिक्सेल कॅमेरा असणाऱ्या ‘Oppo Reno 15’ सीरीजची भारतातील ‘लाँच डेट’ जाहीर!

Latest Marathi News Live Update: पुण्यात सापडली ६७ लाखांची रोकड

SCROLL FOR NEXT