Share Market  Sakal
अर्थविश्व

Share Market Tips : बाजार सुरु होण्याआधी आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म? जाणून घ्या

अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये सुरु असलेल्या चढ-उतारामुळे बाजार खूपच अस्थिर होता.

सकाळ डिजिटल टीम

Share Market Tips : शुक्रवारी अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये सुरु असलेल्या चढ-उतारामुळे बाजार खूपच अस्थिर होता. शुक्रवारी 2 फेब्रुवारीला बेंचमार्क इंडेक्स मोठ्या वाढीसह बंद झाले.

बँकिंग शेअर्समधील तेजीनेही बाजाराला साथ दिली. क्रेडिट रेटिंग एजन्सींनी अदानी ग्रुपच्या कंपन्यांवर दाखवलेला विश्वास, अमेरिकी शेअर बाजारातील तेजी आणि बाजारातील खालच्या पातळीवरून झालेली खरेदी यांचा बाजारावर चांगला परिणाम झाला.

त्यामुळे शुक्रवारी निफ्टी 243.65 अंकांनी अर्थात 1.38 टक्क्यांनी वाढून 17,854.05 वर पोहोचला. तर बीएसई सेन्सेक्स 909.64 अंकांनी म्हणजेच 1.52 टक्क्यांनी वाढून 60,841.88 वर पोहोचला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

गेल्या आठवड्यात निफ्टीने इंट्रावीक आधारावर 40 WEMA तोडल्याचे बीएनपी परिबातर्फे शेअरखानचे गौरव रत्नपारखी यांनी सांगितले. पण त्याला खाली 200 DMA जवळ सपोर्ट मिळाला आणि इथून रिकव्हरी दिसून आली.

हेही वाचा : ढोलेरा- ग्रीनफिल्ड सिटी आणि महाप्रचंड औद्योगिक हब...

निफ्टी 20 डीएमएच्या वर जाण्याचा प्रयत्न करत आहे. अशात तो 18,000 च्या पातळीला स्पर्श करू शकतो असे दिसते. दुसरीकडे, खाली 17,700 जवळ सपोर्ट आहे.

डेली चार्टवर इंडेक्सने फॉलिंग चॅनलच्या आत ट्रेड करत असल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे रुपक डे यांनी सांगितले.

तरी डेली चार्टवर इंडेक्स वर जाण्यापूर्वी फॉलिंग चॅनलच्या लोअर बँडमध्ये सपोर्ट दिसत आहे. येत्या काळात इंडेक्स 17,950-18,000 च्या दिशेने जाण्याची शक्यता आहे. यात घसरण झाली तर डाउनसाइडवर 17,450 वर सपोर्ट दिसतो.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • टायटन (TITAN)

  • अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)

  • बजाज फिनसर्व्ह (BAJAJFINSV)

  • बजाज फायनान्स (BAJFINANCE)

  • एचडीएफसी बँक (HDFCBANK)

  • टीव्हीएस मोटर्स (TVSMOTOR)

  • ट्रेंट (TRENT)

  • झिंदाल स्टील (JINDALSTEL)

  • अशोक लेलँड (ASHOKLEY)

  • श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड (SHRIRAMFIN)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pink E-Rickshaw Scheme: पिंक ई-रिक्षाचा वेग नागपुरात ‘स्लो’; १४०० पैकी केवळ सोळाच रस्त्यावर, महिलांना स्वावलंबी बनविणारी योजना

Latest Marathi News Updates : - पंढरपुरात मुसळधार पावसाची हजेरी, नागरिकांची मोठी तारांबळ उडाली

Hingoli News: अडीच तासांची थरारक प्रतीक्षा; पुरात अडकलेल्या युवकाला ग्रामस्थांनी जीव धोक्यात घालून वाचवले

झुपेडियानं लुटलं! फोटोला रिव्ह्यू देताच पैसे मिळणार, स्कीमने गंडवलं; तरुणांसह शिक्षक अन् कर्मचाऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक

Crime News: प्रेमविवाहाचा भीषण शेवट! पतीने पत्नीला रस्त्यावर गोळ्या घालून संपवलं, मृतदेहाजवळ पिस्तूल घेऊन उभा राहीला

SCROLL FOR NEXT