Share Market Sakal
अर्थविश्व

अकराशेहून अधिक अंशांनी पडलं Share Market; दिवसभरात काय घडलं?

सकाळ डिजिटल टीम

Share Market News: शेअर मार्केटमध्ये गेल्या काही दिवसांपासूनच पडझड होताना दिसून येत आहे. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण दिसून झालेली दिसून आली. शेअर मार्केटवर ओमिक्रॉनच्या सावटामुळे परिणाम पडल्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. सेन्सेक्स आज 56,000 आणि निफ्टी 16,500 च्याही खाली गेलेला दिसून येतोय. आजचे मार्केट बंद झाल्यानंतरच्या आकडेवारीनुसार, सेन्सेक्स (BSE) तब्बल 1,189.73 अंशांनी म्हणजेच 2.09 टक्क्यांनी तर निफ्टी (NSE) 371 अंशांनी म्हणजेच 2.18 टक्क्यांनी घसरला आहे. ओमिक्रॉनच्या सावटामुळे गुंतवणुकदारांचे हे मोठे नुकसान झाल्याची शक्यता आहे.

मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण

आजच्या ट्रेडींगदरम्यान सेन्सेक्समध्ये फक्त हिंदुस्तान युनिलीव्हरचे शेअर्स हिरव्या निशाण्यावर होते. मात्र, ते देखील लाल निशाण्यावर गेले. याव्यतिरिक्त डॉक्टर रेड्डी, विप्रो, नेस्ले इंडिया, पॉवर ग्रीड, एशियन पेंट्स, टीसीएस, सन फार्मा, इन्फोसिस, एचसीएल टेक, मारुती, टायटन, टेक महिंद्रा, भारती एअरटेल, आयटीसी, कोटक बँक, एम अँड एम, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, ऍक्सिस बँक, रिलायन्स, एचडीएफसी, एल अँड टी, अल्ट्राटेक सिमेंट बजाज फिनसर्व, एनटीपीसी, एसबीआय, टाटा स्टील, इंड्सइंड बँक आणि बजाज फायनान्सचे शेअर लाल निशाण्यावर आहेत.

सर्वच क्षेत्रात घसरण

कोरोना व्हायरसच्या महासाथीमध्ये ओमिक्रॉनच्या व्हायरसमुळे तिसऱ्या लाटेच्या शक्यतांमुळे गुंतवणुकदारांच्या चिंता वाढवल्या आहेत. सर्व सेक्टर्स लाल निशाण्यावर होते. यामध्ये आयटी, बँक, ऑटो, फायनान्स सर्व्हीस, एफएमसीजी, मीडिया, मेटल, फार्मा, पीएसयू बँक, प्रायव्हेट बँक आणि रियाल्टी देखील समाविष्ट आहे.

सुरुवातीच्या टप्प्यातच सेन्सेक्स 1,000 हून अधिक अंशांनी घसरला होता. सुरुवातीलाच सेन्सेक्समध्ये 1,028.61 अंश म्हणजेच 1.80 टक्क्यांच्या घसरणीसह 55,983.13 वर होता. निफ्टी 307.50 अंश म्हणजेच 1.81 टक्क्यांच्या घसरणीसह 16,677.70 टप्प्यावर होता. गेल्या शुक्रवारच्या आकडेवारीकडे नजर टाकली तर लक्षात येईल की, सेन्सेक्स 889.40 अंशांनी घसरुन 57,011.74 वर बंद झाला होता. निफ्टी 263.20 अंशांनी घसरुन 16,985.20 वर बंद झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कमर्शियल LPG मध्ये मोठा बदल! आता १० किलोचे सिलेंडर मिळणार; व्यावसायिकांची अडचण दूर होणार

IND vs ENG 1st ODI: ५-२-३-१... टीम इंडियाचा फॉर्म्युला ठरला; इंग्लंडला सव्याज परतफेड करणारी तगडी प्लेइंग इलेव्हन

Latest Marathi News Live Update : चंपत राय यांच्यासह इतर विश्वस्तांवर काय कारवाई केली जाणार आहे? - विजय वडेट्टीवार

Jalna: वारकऱ्यांसाठी दहा वर्षांपासून अखंड जलसेवा; संदीप कंटुले यांच्याकडून माउलीच्या पालखीत टँकरद्वारे मोफत पाणी

Karnataka SIR Campaign : बनावट कागदपत्रांच्या आधारे पाकिस्तानी नागरिक राहत होते कर्नाटकात; 'एसआयआर' मोहिमेदरम्यान धक्कादायक प्रकार उघड, 'त्या' कुटुंबाचं दुबई कनेक्शन काय?

SCROLL FOR NEXT