Share Market esakal
अर्थविश्व

Share Market: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी गुंतवणूकदारांना दिलासा! Sensex मध्ये 840 अंकाची तेजी

आज सुरवातीच्या सत्रात शेअर बाजार तेजीसह सुरू झाला.

सकाळ डिजिटल टीम

आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या आठवड्याभरापासून शेअर बाजारात अस्थिरता दिसून येत होती. आज मात्र सुरवातीच्या सत्रात शेअर बाजार मोठ्या तेजीसह सुरू झाला.

आज बाजारात सेन्सेक्स 840 अंकाच्या तेजीसह 61,450 वर सुरू झाला तर निफ्टी 242 अंकाच्या तेजीसह 18,275 वर सुरू झाला. आज सुरवातीच्या सत्रात 48 शेअर्समध्ये तेजी तर 2 शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे. ( share market update 1November 2022)

गुरुवारी सेन्सेक्स-निफ्टी सलग दुसऱ्या दिवशी लाल चिन्हात बंद झाला. सेन्सेक्स 419.85 अंकांनी अर्थात 0.69 टक्क्यांनी घसरून 60613.70 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 128.80 अंकांनी म्हणजेच 0.71 टक्क्यांनी घसरून 18028.20 वर बंद झाला.

संथ जागतिक संकेतांमुळे गुरुवारी बाजारात सावधता दिसून आल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले. ऑटो आणि पीएसयू बँक शेअर्स प्रॉफीट बुकींग  दिसून आली. आता जगभरातील गुंतवणूकदारांची नजर अमेरिकेच्या चलनवाढीच्या आकडेवारीकडे आहे.

गुरुवारी सेक्टरल इंडेक्स लाल रंगात बंद झाले. निफ्टी ऑटो आणि पीएसयू बँकांमध्ये 1 ते 2 टक्क्यांची घसरण झाली आहे. त्याच वेळी, फार्मा, मेटल, एनर्जी, इन्फ्रा आणि एफएमसीजीमध्ये 0.5 टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. बीएसई मिड आणि स्मॉल कॅप 1 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

टाटा मोटर्स (TATAMOTORS)
ऍक्सिस बँक (AXISBANK)
महिन्द्रा अँड महिन्द्रा (M&M)
बजाज फिनसर्व्ह (BAJAJFINSV)
टायटन (TITAN)
ऑरो फार्मा (AUROPHARMA)
टीव्हीएस मोटर्स (TVSMOTOR)
ए यू बँक (AUBANK)
बालक्रिष्ण इंडस्ट्रीज (BALKRISIND)
श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड (SRTRANSFIN)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सदावर्ते गट-शिंदे गटात राडा; एसटी बँक संचालक मंडळाच्या बैठकीत हाणामारी

INDW vs AUSW: चुकीला माफी नाही! भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाने पराभूत केलंच, पण ICC नेही सुनावली शिक्षा

Vasu Baras Marathi Wishes: आली दिवाळी ,आली दिवाळी...! मित्रपरिवाराला अन् नातेवाईकांना पाठवा मराठीतून वसुबारच्या खास शुभेच्छा

Diwali Festival 2025: दिवाळीनिमित्ता घ्या प्रभू श्री रामांचे 5 प्रेरणादायी गुण आणि बदला आपलं जीवन

Maharashtra Politics: ठाण्यात महायुतीमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी! भाजप-शिंदे गटात शाब्दिक झाडाझडती

SCROLL FOR NEXT