Share Market esakal
अर्थविश्व

Share Market : बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मंगळवारी सलग तिसर्‍या दिवशी प्रचंड अस्थिरता दिसून आली.

सकाळ डिजिटल टीम

सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मंगळवारी सलग तिसर्‍या दिवशी प्रचंड अस्थिरता दिसून आली.

सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मंगळवारी सलग तिसर्‍या दिवशी प्रचंड अस्थिरता दिसून आली. ऑटो, मेटल, रियल्टी आणि फायनांशियल शेअर्समुळे बाजाराला (Share Market) चांगला सपोर्ट मिळाला. शेवटी सेन्सेक्स 246.47 अंकांच्या म्हणजेच 0.45 टक्क्यांच्या वाढीसह 54,767.62 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 51.50 अंक म्हणजेच 0.32 टक्क्यांच्या वाढीसह 16,330.00 वर बंद झाला.

आज कशी असेल शेअर बाजाराची स्थिती?

निफ्टी मंगळवारच्या संपूर्ण व्यवहाराच्या कालावधीत मजबूत राहिला आणि डेली टाइम फ्रेमवर आधीच्या स्विंग हायवर जाताना दिसल्याचे LKP सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. निफ्टीने डेली टाईम फ्रेमवर हायर टॉप आणि हायर बॉटम फॉर्मेशन दाखवले. निफ्टी त्याच्या सर्व प्रमुख मूव्हिंग एव्हरेजच्या वर राहिला आहे, जे आणखी वाढीचे लक्षण आहे. शॉर्ट टर्ममध्ये, जोपर्यंत निफ्टी 16,100 च्या वर राहील तोपर्यंत तो तेजीचे संकेत आहेत आणि 16,450-16,500 ची पातळी गाठण्याची शक्यता असेल.

तांत्रिक दृष्टिकोनातून, निफ्टी आणि सेन्सेक्सने 1,6300 आणि 54,500 चा रझिस्टंस तोडला आणि त्याच्या वर बंद होण्यात यशस्वी झाले, जे बाजारासाठी एक चांगले चिन्ह असल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. निफ्टीने डेली चार्टवर डेली चार्टवर हायर बॉटम फॉर्मेशन होल्ड केले आहे आणि लाँग बुलिश कँडल तयार केल्याचे ते म्हणाले.

निफ्टीच्या शॉर्ट टर्म सेटअपमध्ये आणखी वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत. व्यापार्‍यांसाठी, निफ्टीमधील 16250 आणि सेन्सेक्समधील 54,300 ची पातळी ट्रेंड डिसायडर म्हणून काम करेल. जर ही पातळी वर तुटली तर निफ्टी 16,400-16,450 च्या दिशेने आणि सेन्सेक्स 55,000-55,200 च्या दिशेने जाताना दिसेल. दुसरीकडे, जर निफ्टी 16250 च्या खाली घसरला तर तो 16,150 च्या दिशेने जाताना दिसेल. दुसरीकडे, सेन्सेक्स 54,300 च्या खाली गेला तर 54,000 ची पातळीही दिसू शकते.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • अॅक्सिस बँक (AXISBANK)

  • अपोलो हॉस्पिटल (APOLLOHOSP)

  • महिन्द्रा अँड महिन्द्रा (M&M)

  • इंडसइंड बँक (INDUSINDBK)

  • टाटा स्टील (TATASTEEL)

  • पर्सिस्टंट (PERSISTENT)

  • गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

  • भारत फोर्ज (BHARATFORG)

  • व्होल्टास (VOLTAS)

  • ए यू बँक (AUBANK)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT