अर्थविश्व

50 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा शेअर देईल मजबूत परतावा, तज्ज्ञांना विश्वास...

शिल्पा गुजर

शेअर बाजारातही गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अस्थिरता दिसून येत आहे. त्यातही कंपन्यांच्या निकालादरम्यान अनेक शेअर्सने चांगले परफॉर्म केले आहे. अशातच सरकारी मालकीच्या इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडच्या (Ircon International Ltd) शेअरने दमदार परतावा दिला आहे. मार्च 2022 च्या तिमाहीत मजबूत निकालानंतर हा PSU स्टॉक ब्रोकरेज हाऊस IDBI कॅआयडीबीआय कॅपिटलने या शेअरने 50 रुपयांच्या खाली खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. IRCON इंटरनॅशनल ही रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणारी कंपनी आहे.

50% वाढ अपेक्षित:

ग्लोबल ब्रोकरेज फर्म IDBI कॅपिटलने इरकॉन इंटरनॅशनलला खरेदी सल्ला दिला आहे. तसेच, शेअरचे टारगेट 60 रुपये ठेवण्यात आले आहे. 31 मे 2022 रोजी शेअरची किंमत 40 रुपये प्रति शेअर होती. अशाप्रकारे, सध्याच्या किंमतीपासून या स्टॉकमध्ये सुमारे 50 टक्के वाढ दिसू शकते असा विश्वास त्यांना आहे.

Q4FY22 मध्ये कंपनीचा महसूल अंदाजापेक्षा 20 टक्के जास्त आहे. EBITDA मार्जिन त्यामानाने कमकुवत राहिले. चौथ्या तिमाहीत 3000 कोटी रुपयांची मजबूत ऑर्डर इनफ्लो होता. आर्थिक वर्ष 2022 मध्ये एकूण 16,200 कोटी रुपयांचा ऑर्डर इनफ्लो होता.

इरकॉनने 8 टक्के EBITDA मार्जिनसह, FY23E मध्ये 10-15% महसूल वाढीचे लक्ष्य ठेवल्याचे ब्रोकरेजचे म्हणणे आहे. कंपनीने प्रति शेअर 0.65 रुपये डिव्हिडेंड जाहीर केला आहे. 60 रुपयांच्या टारगेटसह हे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

चौथ्या तिमाहीचे निकाल-

इरकॉन इंटरनॅशनलचा महसूल जानेवारी-मार्च 2022 मध्ये 24 टक्क्यांनी (YoY) 2800 कोटी रुपयांवर गेला. EBITDA वार्षिक 45 टक्क्यांनी घसरून 100 कोटी रुपयांवर आला आहे. निव्वळ नफ्याबद्दल (Net Profit) बोलायचे झाल्यास, Q4FY22 मध्ये तो 200 कोटींहून अधिक होता. वार्षिक आधारावर 6 टक्के आणि तिमाही आधारावर 52 टक्के नफ्यात वाढ झाली आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT